Saturday, September 26, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

ठाकरेंच्या शिवसेनेच्या ७ नेत्यांवर भाषणांमुळे गुन्हा, शिवसेना म्हणते हा तर महाप्रबोधन यात्रेला शुभशकुन!

September 5, 2026
in घडलं-बिघडलं
0
shivsena 7 leaders

मुक्तपीठ टीम

ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे पार पडलेल्या ठाकरे गटाच्या महाप्रबोधन मेळाव्यात नेत्यांनी आक्षेपार्ह भाषण केल्याप्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुषमा अंधारे, भास्कर जाधव, विनायक राऊत, मधुकर देशमुख, राजन राजे आणि अनिता बिर्जे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कलम १५३, ५०० आणि ५०४ तसेच कलम १५३ अंतर्गत मानहानीकारक वक्तव्य, अंतर्गत बदनामी आणि चितावणीखोर वक्तव्य केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी शिंदे गटाचे नौपाडा येथील उपविभागाप्रमुख बाळा गवस यांनी तक्रार दिली आहे.

ठाकरेंच्या ७ जणांवर गुन्हा दाखल!!

  • ठाण्यातील टेंभीनाका येथे शिवसेनेच्या ठाकरे गटाची महाप्रबोधन मेळावा आयोजित करण्यात आला होता.
  • ठाण्याच्या गडकरी रंगायतनात ठाकरे गटाच्या महाप्रबोधनयात्रेचा शुभारंभ झाला.
  • यावेळी सुषमा अंधारे, विनायक राऊत भास्कर जाधव, मधुकर देशमुख आणि अनिता बिर्जे यांनी भाषणे केले.
  • या मेळाव्यात यावेळी भास्कर जाधवांनी शिंदेंची नक्कल केली, राऊतांनी राणेंची नक्लल केली, तर अंधारेंनी पंतप्रधान मोदींची नक्कल केली, यातून बदनामी झाल्याचा आरोप ठेवत त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला.
  • राजन राजे, अनिता बिर्जे, मधुकर देशमुख यांच्यावरही गुन्हा नोंद झाला आहे.
  • शिंदे गटाचे बाळा गवस यांनी याबाबत तक्रार दाखल केली आहे.
  • या तक्रारीनुसार सर्व नेत्यांवर गुन्हा दाखल झाला आहे.

सुषमा अंधारेंची प्रतिक्रिया!!

  • विविध प्रसार माध्यमांकडून असे कळले की महाप्रबोधन यात्रेच्या उद्घाटन सभेतील वक्ते म्हणून खासदार राजन विचारे मी स्वतः, आमदार भास्कर जाधव खासदार विनायक राऊत, आणि आमच्या अनिताताई बिरजे यांच्यावरती १५३ अ नुसार गुन्हे दाखल झाले आहेत.
  • मात्र अजूनही माझ्याकडे रितसर याची प्रत मिळालेली नाही.
  • महाप्रबोधन यात्रेतील सगळी भाषण पब्लिक डोमेन मध्ये आहेत.
  • ती तपासून घेता येतील मला खात्री आहे त्यातलं एकही वाक्य हे कायद्याच्या चौकटीच्या बाहेर जाणार नाही.
  • कायदा माझ्या बापाने लिहिला आहे आणि त्याचा सन्मान राखणं ही माझी नैतिक जबाबदारी आहे. तरीसुद्धा १५३ अ अर्थात चितावणीखोर वक्तव्य या सबबी खाली दाखल झालेला गुन्हा हा आमच्या महाप्रबोधन यात्रेच्या सुरुवातीचा #शुभशकुन आहे असा आम्ही समजतो, असे सुषमा अंधारे यांनी या प्रकरणानंतर म्हटले.

Tags: bhaskar jadhavMaha Prabodhan MelvaSushma AndhareVinayak Rautभास्कर जाधवमहाप्रबोधन मेळावाविनायक राऊतशिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेसुषमा अंधारे
Previous Post

सांगलीची शाळा लोकल, विक्रम केला ग्लोबल!

Next Post

“पंजाच्या पकडीतील मशाल महाराष्ट्र स्वीकारणार नाही”

Next Post
Bawankule And uddhav thackeray

"पंजाच्या पकडीतील मशाल महाराष्ट्र स्वीकारणार नाही"

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!