मुक्तपीठ टीम
केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत प्रोसिक्यूटर या पदासाठी १२ जागा, जनरल मेडिसिन स्पेशलिस्ट ग्रेड ३ या पदासाठी २८ जागा, आयुर्वेद असिस्टंट प्रोफेसर या पदासाठी ०१ जागा, युनानी असिस्टंट प्रोफेसर/ मौलाजात या पदासाठी ०१ जागा, व्हेटनरी ऑफिसर या पदासाठी १० जागा अशा एकूण ५२ जागांसाठी ही नोकरीची संधी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, १३ ऑक्टोबर २०२२ पर्यंत अर्ज करु शकतात. नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत आहे.
शैक्षणिक पात्रता
अर्ज करणारा उमेदवार,
- पद क्र.१- पदवीधर + एलएलबी + ०१ वर्ष अनुभव किंवा एलएलएम + ०२ वर्षे अनुभव
- पद क्र.२- १) एमबीबीएस २) पदव्युत्तर पदवी किंवा डिप्लोमा ३) ०३ वर्षे अनुभव
- पद क्र.३- आयुर्वेद मेडिसिन पदवी २) पदव्युत्तर पदवी
- पद क्र.४- युनानी मेडिसिन पदवी २) पदव्युत्तर पदवी
- पद क्र.५- पशुवैद्यकीय पात्रता असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय पद क्र.१ साठी ३० वर्ष, पद क्र.२ साठी ४० वर्ष, पद क्र.३ साठी ५० वर्ष, पद क्र.४ साठी ४८ वर्ष, पद क्र.५ साठी ३५ वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे.
शुल्क
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या जनरल/ ओबीसी/ ईडब्ल्यूएस उमेदवारांकडून २५ रूपये शुल्क आकारले जाणार, तर एससी/ एसटी/ पीएच/ महिला उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.
अधिक माहितीसाठी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या अधिकृत वेबसाइट https://upsc.gov.in/ वरून माहिती मिळवू शकता.
नोकरीचे ठिकाण
https://www.upsconline.nic.in/ora/VacancyNoticePub.php
अधिकृत जाहिरात
https://drive.google.com/file/d/1KINt6Yw5hzv-VerMsMknkAa3TWaQ5ii8/view