मुक्तपीठ टीम
इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियात ज्युनियर टेक्निशियन या पदावर इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक या पदासाठी ८१४ जागा, इलेक्ट्रिशियन या पदासाठी १८४ जागा, फिटर या पदासाठी ६२७ जागा अशा एकूण १ हजार ६२५ जागांवर ही भरती होणार आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, ११ एप्रिल २०२२ पर्यंत अर्ज करु शकतात. नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत आहे.
शैक्षणिक पात्रता
अर्ज करणारा उमेदवार, १) इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक/ इलेक्ट्रिशियन/ फिटर या क्षेत्रात आयटीआय केलेला असणे. २) ०१ वर्ष अनुभव असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय ३० वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे.
शुल्क
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.
अधिक माहितीसाठी भारतीय नौदलाच्या अधिकृत वेबसाइट https://www.ecil.co.in/ वरून माहिती मिळवू शकता.
पाहा व्हिडीओ: