मुक्तपीठ टीम
नॅशनल सेंटर फॉर पोलर अँड ओशन रिसर्च कडून विविध पदांसाठी भरती प्रक्रिया आयोजित करण्यात आली आहे. सायंटिस्ट आणि एक्झ्युक्यूटिव्ह असिस्टंट आणि इतर ८५ पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. पात्र आणि इच्छुक उमेदवार, १५ जुलै २०२१ पर्यंत अर्ज करु शकतात.
शैक्षणिक पात्रता
अर्ज करणारा उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठातून किंवा संस्थेतून बीई आणि बीटेक उत्तीर्ण असावे. उमेदवारांकडे ७ वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे. निवड झालेल्या उमेदवारांना ३६ हजारांपासून ५६ हजारांपर्यंत पगार मिळणार आह.
असा करावा अर्ज
- पात्र उमेदवारांनी एनसीपीओआरच्या वेबसाईट (www.ncaor.gov.in) ला भेट द्यावी.
- वेबसाइटवरील ‘Career’ ऑप्शन वर क्लिक करा.
- यानंतर नवीन वेबपेज ओपन होईल.
- यानंतर NCPOR/09/2021 पुढील NCPOR_Advt_2021.PDF लिंक वर क्लिक करुन जाहिरात वाचून घ्या.
- जाहिरात वाचल्यांतर तुम्ही पात्र असलेल्या पदासाठी अर्ज करावे.
अधिक माहितीसाठी
एनसीपीओआरच्या अधिकृत वेबसाइट ncpor.res.in वरून माहिती मिळवू शकता.