मुक्तपीठ टीम
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत १) वरिष्ठ भूवैज्ञानिक भूविज्ञान आणि खाण संचालनालय, नागपूर, गट- अ, २) विद्युत कार्यकारी अभियंता, महाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी सेवा, सार्वजनिक बांधकाम विभाग, गट-अ, ३) अधीक्षक, सामान्य राज्य सेवा, गट-ब (प्रशासन शाखा), ४) औषधी निर्माता, महाराष्ट्र आयुर्वेदिक सेवा, महाराष्ट्र वैद्यकीय शिक्षण व औषधी विभाग, गट-ब, ५) विधि सहाय्यक, कायदा व न्याय विभाग, गट-ब या पदांवर एकूण ८८ जागांसाठी नोकरीची संधी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, १४ नोव्हेंबर २०२२ पर्यंत अर्ज करु शकतात.
शैक्षणिक पात्रता
अर्ज करणारा उमेदवार,
- पद क्र.१- १) जिओलॉजी किंवा अप्लाइड जिओलॉजीमध्ये किमान द्वितीय श्रेणीत पदव्युत्तर पदवी असणे आवश्यक आहे २) ०५ वर्षे अनुभव
- पद क्र.२- १) इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग पदवी २) ०८ वर्षे अनुभव
- पद क्र.३- १) किमान द्वितीय श्रेणीची पदवी किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदव्युत्तर पदवी २) ०३ वर्षे अनुभव
- पद क्र.४- १) बीएएमएस २) ०३ वर्षे अनुभव
- पद क्र.५- विधि पदवी असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय १८ ते ३८ वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे.
शुल्क
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या जनरल वर्गातील उमेदवारांकडून ७१९ रूपये शुल्क आकारले जाणार तर, मागासवर्गीय/ ईडब्ल्यूएस/ अनाथ उमेदवारांकडून ४४९ रूपये शुल्क आकारले जाणार आहे.
अधिक माहितीसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अधिकृत वेबसाइट https://www.mpsc.gov.in/ वरून माहिती मिळवू शकता.
नोकरीची लिंक
https://mpsconline.gov.in/candidate
अधिकृत जाहिरात
वरिष्ठ भूवैज्ञानिक भूविज्ञान आणि खाण संचालनालय:
https://drive.google.com/file/d/1uT-wu4MU6vXWdxrP7rLeVx6dfKO_cMhP/view
विद्युत कार्यकारी अभियंता:
https://drive.google.com/file/d/1dlnOzTpTRCtzFTz6aifysHSuF_BNC-_R/view
अधीक्षक, सामान्य राज्य सेवा:
https://drive.google.com/file/d/1Udwsq9HdztKmvGC_nmWIq_PtcO_ei5xc/view
औषधी निर्माता:
https://drive.google.com/file/d/1P2XZWhxegUObp7pHtK5i60CGzlpmz_XA/view
विधि सहाय्यक:
https://drive.google.com/file/d/1hDY8oLxxBSeL_faEJZEwUek04002mnDR/view