मुक्तपीठ टीम
भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेडमध्ये इंजिनीअर एफटीए-सिव्हिल या पदासाठी ७ जागा, सुपरवायझर एफटीए-सिव्हिल या पदासाठी १५ जागा अशा एकूण २२ जागांसाठी भरती आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, २४ सप्टेंबर २०२१ पर्यंत अर्ज करु शकतात.
शैक्षणिक पात्रता
अर्ज करणारा उमेदवार, १) पद क्र.१- १) सिव्हिल इंजिनीअरिंग पदवी/ पदव्युत्तर पदवी २) २ वर्षे अनुभव
२) पद क्र.२- १) सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा २) २ वर्षे अनुभव असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा
या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय ३४ वर्षांपर्यंत असावे.
शुल्क
या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडून २०० रूपये शुल्क आकारले जाणार.
अधिक माहितीसाठी
भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेडच्या अधिकृत वेबसाइट https://www.bhel.com/ वरून माहिती मिळवू शकता.