मुक्तपीठ टीम
हिंदुस्तान पेट्रोलियममध्ये मेकॅनिकल इंजिनीअर, इलेक्ट्रिकल इंजिनीअर, इंस्ट्रुमेंटेशन इंजिनीअर, सिव्हिल इंजिनीअर, केमिकल इंजिनीअर, इंफॉर्मेशन सिस्टम ऑफिसर, सेफ्टी ऑफिसर, फायर अॅंड सेफ्टी ऑफिसर, क्वालिटी कंट्रोल ऑफिसर, ब्लेंडिंग ऑफिसर, चार्टर्ड अकाउंटेंट, एचआर ऑफिसर, मुंबई रिफायनरी वेलफेयर ऑफिसर, लॉ ऑफिसर, लॉ ऑफिसर-एचआर, मॅनेजर/ सिनियर मॅनेजर-इलेक्ट्रिकल या पदांसाठी एकूण २९४ जागांवर नोकरीची संधी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, २२ जुलै २०२२ पर्यंत अर्ज करु शकतात. नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत आहे.
शैक्षणिक पात्रता
अर्ज करणारा उमेदवारांची शैक्षणिक पात्रता, पदांनुसार आणि नियमांनुसार असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय १८ ते ३७ वर्षांर्यंत असणे आवश्यक आहे.
शुल्क
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या जनरल/ ओबीसी/ ईडब्ल्यूएस उमेदवारांकडून १ हजार १८० रूपये शुल्क आकारले जाणार तर, एससी/ एसटी/ पीडब्ल्यूबीडी उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.
अधिक माहितीसाठी हिंदुस्तान पेट्रोलियमच्या अधिकृत वेबसाइट https://www.hindustanpetroleum.com/ वरून माहिती मिळवू शकता.