मुक्तपीठ टीम
भारत डायनामिक्स लिमिटेड म्हणजेच बीडीएलने अॅप्रेंटिस पदासाठी भरती जाहिर केली आहे. त्याअंतर्गत एकूण १३ पदे नेमली जातील. इच्छुक आणि पात्र उमेदवार विहित अर्जाच्या नमुनाद्वारे ५ मार्च २०२१ रोजी किंवा त्यापूर्वी अर्ज करू शकतात. या रोजगारसंधीविषयी अधिक माहितीसाठी मुक्तपीठच्या www.muktpeeth.com वरील नोकरी-धंदा-शिक्षण कॅटेगरी तपासा.
अधिकृत संकेतस्थळावरील Http://apprenticeshipindia.org च्या अधिसूचनेनुसार फिटरच्या ७ पदांवर, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक ४, इलेक्ट्रीशियनच्या २ पदांवर नेमणुका केल्या जातील. अॅप्रेंटिस पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी हे लक्षात ठेवले पाहिजे की त्यांना टीए, डीए देण्यात येणार नाही. या व्यतिरिक्त, भारत डायनॅमिक्स लिमिटेड (बीडीएल) आवश्यकतेनुसार रिक्त पदांची संख्या वाढवू किंवा कमी करू शकते. हा अधिकार पूर्णपणे बीडीएलने राखून ठेवला आहे.
शैक्षणिक पात्रता
या पदांवर ऑनलाईन अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेकडून दहावी पास व आयटीआय पास असणे आवश्यक आहे. आरक्षित प्रवर्गाच्या उमेदवारांना शासकीय नियमानुसार शिथिलता देण्यात येणार आहे. अभियांत्रिकी पदवीधर आणि पदविकाधारक या पदासाठी अर्ज करू शकत नाहीत, हे उमेदवारांनी लक्षात घ्यावे.
वयोमर्यादा
उमेदवाराचे कमाल वय ३० वर्षे असावे.
भारत डायनामिक्स लिमिटेडच्या अधिकृत वेबसाइट https://bdl-india.in/ वरून माहिती मिळवू शकता.
या रोजगारसंधीविषयी अधिक माहितीसाठी मुक्तपीठच्या www.muktpeeth.com वरील नोकरी-धंदा-शिक्षण कॅटेगरी तपासा.