मुक्तपीठ टीम
मुस्लिम समाजाच्या शैक्षणिक जनजागृती करीता करियर गाईंडन्ससोबत शैक्षणिक मुशायराचा एक आगळा वेगळा कार्यक्रम प्रोग्रेसिव्ही एज्युकेशन फाउंडेशन तर्फे काझीपुऱ्यात उमरखेडमध्ये राबविण्यात आला. कार्यक्रमाचे आयोजन नाझीर अतिष व त्यांच्या मित्र मंडळीने केले. या कार्यक्रमात रज्जा़क सिद्दीकी सर अध्यक्ष तर प्रमुख पाहुणे म्हणून कवी खान हसनैन अकिब व गफ्फार अतिष उपस्थित होते.
गफ्फार अतिष,परवेज पीरजादा, आजहर बेलगाम, ईकराम, रिअर गायडन्स इत्यादि शायर मंडळीनी प्रेक्षकांना आपल्या शायरीद्वारे आकर्षित केले. या कार्यक्रमात एक करिअर गायडन्सचा कार्यक्रमसुद्धा ठेवण्यात आला होता. यासाठी प्रमुख प्रवक्ते म्हणून पुसदचे करिअर कौन्सिलर तसेच स्पर्धा परीक्षेचे मार्गदर्शक प्रा.सलमान सय्यद शेरू होते.
प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन फाऊंडेशन तर्फे राजू भाऊ कव्हाणे यांच्या हस्ते प्रा.सलमान सय्यद शेरू यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाच्या भाषणात प्रा.सलमान सय्यद यांनी शैक्षणिक सामाजिक आणि समाजात स्पर्धा परिक्षेच्या जनजागृतीचे प्रतिपादन केले. ते म्हणाले प्रशासकिय सेवेसाठी यु.पि.एस.सि / एम. पि.एस.सि सारख्या स्पर्धा परीक्षेसाठी मुलांना तयार करावे लागेल आणि आधुनिक शिक्षण घेऊन समाजाच्या मुख्य प्रवाहात आणावे लागेल.
या कार्यक्रमाचे सूत्र संचांलन मोसींन साहिल यांनी केले. या कार्यक्रमात आजहर बेलगाम,इकराम अज़हर,परवेज़ पीरजादा सहाब,मुद्दसिर सुफी,फय्याज अहेमद,ई शाएर मंडळींनी आपल्या शायरीचे खुप चांगले प्रदर्शन केले. यामध्ये मुझ्झमिल काझी व ईल्म हासिल करो ऑर्गनायझेशनच्या सर्व पदाधिकार्यांच्या मदतीने हा कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला.