मुक्तपीठ टीम
सर्वांना लहानपणी प्रथम दुधाचे दात येतात. वयाच्या सातव्या आठव्या वर्षी चे पडायला सुरवात होते आणि कायमचे दात येतात. लहान मुलांच्या तुटलेल्या दुधाच्या दातांबद्दल आपण बर्याच कथा ऐकल्या असतील, जसे की आपण उशाखाली तुटलेला दात ठेवला परी रात्री येऊन तो दात घेऊन जाते आणि त्याबदल्यात सोन्याचे नाणे ठेवून जाते. मात्र अलीकडेच ९ वर्षाच्या ल्यूक बोल्टनला सोन्याचे नाणे नाही तर एक मौल्यवान बक्षीस मिळाले आहे. जगात सर्वाधिक लांबीचा दुधाचा दात असल्यामुळे त्याचे नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदले गेले आहे.
ल्यूक कॅनडामध्ये राहतो
ल्यूक बोल्टन हा कॅनडामध्ये राहतो. अलीकडेच, गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्सने ब्लॉगद्वारे सांगितले आहे की सप्टेंबर २०१९ मध्ये ल्यूक बोल्टनचे दात आठ वर्षांचे असताना काढले गेले होते. ल्यूकच्या दातांची लांबी २.६ सेंटीमीटर आहे. ल्यूकने सर्वांना दाखवण्यासाठी शोकेसमध्ये आपले दात ठेवले. अलीकडे जेव्हा ल्यूकला सांगितले गेले की त्याचा तुटलेला दुधाचे दात जगातील सर्वाधिक लांबीचा दात आहे, तेव्हा त्याला आनंद झाला.
याआधी कर्टिस बॅडीने हे विक्रम केले होते
गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डनुसार ल्यूकने आता जागतिक विक्रम नोंदविला आहे. यापूर्वी हा विश्वविक्रम कर्टिस बॅडीच्या नावावर होता, ज्यांची दुधाच्या दाताची लांबी २.४ सेंटीमीटर होती. ल्यूकचे वडील म्हणतात की मला आश्चर्य वाटते की त्यांच्या मुलाच्या तोंडात इतका लांब दात होता.