मुक्तपीठ टीम
देशात एकीकडे कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातलेले असताना, तिसऱ्या लाटेचे भाकित सांगणारे केंद्र सरकारचे मुख्य वैज्ञानिक सल्लागार के. विजय राघवन यांनी आज काहीसा दिलासा दिला आहे. त्यांच्या मते, , ही लाट सर्वत्र पसरणार नाही. राघवन म्हणाले की, आवश्यक उपाययोजनांचा अवलंब केल्यास देशाच्या प्रत्येक भागात कोरोनाची तिसरी लाट पसरणार नाही. त्यांनी गुरुवारी देशात तिसरी लाट येणार असल्याचं विधान केलं होतं.
काय म्हणाले के. विजय राघवन?
- ‘कोरोना लाट आणि वाढत्या रुग्णसंख्येवर चर्चा न करता, त्यांचं संभाव्य ठिकाण, वेळ आणि त्यांचा परिणाम काय होऊ शकतो, यावर चर्चा केली पाहीजे.
- कठोर पावलं उचलण्याबरोबरच कोरोना नियमांची काटेकोर अंमलबजावणी केल्यास तिसरी लाट सर्वत्र पसरणार नाही.
- कोरोना संकटाला सामोरे जाण्यासाठी स्थानिक, राज्य, जिल्हा आणि शहर पातळीवर कोरोना संदर्भातील सर्व नियम आणि मार्गदर्शक तत्वांची अंमलबजावणी केली जाते, यावर बरंच काही अवलंबून आहे.
- जरी हे अवघड असले तरी आपल्याला कोरोना संसर्गाचे दुष्परिणाम टाळायचे असल्यास ते करावे लागेल.
- संधी मिळाल्यावर कोरोना संसर्ग झपाट्याने पसरतो ही एक साधी समजून घ्यावी, अशी बाब आहे.
- परंतु जेव्हा आपण खबरदारी घेतो तेव्हा आपल्याला त्याचा वेग कमी होताना दिसतो.
- जेव्हा लसीकरणाला गती मिळेल, लोक सोशल डिस्टंन्सिंग नियमांचे काटेकोरपणे पालन करतील तेव्हा कोरोनाचा प्रसार कमी होईल.
- कोरोनाच्या संसर्गाची गती कमी होण्याचा अर्थ असा होत नाही की तो आता संपला आहे.
- जर आपण निष्काळजीपणाने वागलो तर कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढू शकतो.