मुक्तपीठ टीम
जगातील सर्वाधिक वापरले जाणारे मेसेजिंग अॅप व्हॉट्सअॅप नवीन नवीन फीचर्स घेऊन येत आहेत मग ते मेसेज युअरसेल्फ असो, कम्युनिटी ग्रुप, ग्रुप कसा शोधायचा, इमोजी रिप्लाय आणि बरेच काही. हे सर्व अपडेट एकदम गमतीदार आहेत.युजर्स देखील या अपडेटचा आनंद घेत आहेत आणि आता २०२३ नवीन वर्षात व्हॉट्सअॅप कॉल रेकॉर्डिंगचा नवीन फिचर घेऊन येणार आहे. हे युजर्ससाठी खूप उपयुक्त ठरू शकते. रोलआऊटनंतर फीचर्स युजर्सना खूप आवडले आहेत.
२०२३ मध्ये येणार अनेक उत्तम फिचर्स….
- २०२३ मध्ये व्हॉट्सअॅपवर अनेक धमाकेदार फीचर्स येणार आहेत.
- पुढील वर्षी व्हॉट्सअॅप कॉल रेकॉर्डिंग, मेसेज एडिट यांसारखे अनेक फिचर्स लाँच करण्याची शक्यता आहे.
- व्हॉट्सअॅप सर्व युजर्सना मेसेज स्वयंचलितपणे हटविण्याची देते, परंतु मेसेज एडिट करण्याचा पर्याय अद्याप उपलब्ध नाही.
- हे फीचर लवकरच लाँच केले जाऊ शकते.
- व्हॉट्सअॅपवरील सर्व युजर्ससाठी ऑटो-डिलीट फिचरमध्ये मेसेज शेड्यूल करण्याचा पर्याय नाही.
- ऑफिस व्हॉट्सअॅप जे जास्त वापरतात त्यांच्यासाठी हे फिचर उपयुक्त ठरेल.
- ज्या प्रकारे युजर्स अद्याप मेसेज एडिट करू शकत नाहीत, त्याचप्रमाणे युजर्सकडे तो अनसेंड करण्याचा पर्याय नाही.
- आतापर्यंत सर्व व्हॉट्सअॅप यूजर्सना डिलीट करण्याचा पर्याय उपलब्ध होता.
- मात्र मेसेज डिलीट केल्यानंतर समोरच्या व्यक्तीला समोरच्या व्यक्तीने मेसेज पाठवला आणि डिलीट केल्याचे समजते.
- नवीन फीचर आणल्यानंतर युजरने मेसेज अनसेंड करताच समोरच्या चॅटमध्ये मेसेज गायब होईल.
- इन्स्टाग्राम आणि फेसबुक मेसेंजरवर व्हॅनिश मोड फिचर सक्रिय आहे.
- लवकरच व्हॉट्स अॅपवर देखील हा फिचर लाँच केला जाऊ शकते.
- या फीचरमुळे संपूर्ण चॅट डिलीट करता येणार आहे.
- हे चॅटचे स्क्रीनशॉट घेणे टाळू शकता.