Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

“व्‍यापाऱ्यांचा एमएसएमईमध्‍ये समावेश हा क्रांतिकारक निर्णय”: सीए मिलिंद कानडे

July 3, 2021
in घडलं-बिघडलं
0
msme

मुक्तपीठ टीम

व्‍यापाऱ्यांचा एमएसएमईमध्ये समावेश झाल्‍यामुळे आता, देशातील सर्व व्यापाऱ्यांना कमी व्याजदराने अर्थपुरवठा मिळणे सुलभ होणार असून कमी वाढीव सुरक्षा हमीवर कर्ज मिळणे शक्‍य होईल. त्यामुळे केंद्र सरकारचा हा निर्णय क्रांतिकारक आहे, अशा शब्दांत भाजपाच्या आर्थिक आघाडीचे महाराष्ट्र राज्य संयोजक सीए मिलिंद कानडे यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे.

 

एमएसएमई संदर्भात घेण्‍यात आलेल्‍या या निर्णयाचे व्यापक परिणाम होणार आहे. या निर्णयामुळे महागाई कमी होण्‍यास हातभार लागणार असून एमएसएमईला जवळपास ४० कोटी लोकांना रोजगार प्राप्‍त करून देता येईल. सोबतच, वार्षिक ११५ लाख कोटींची उलाढाल करता येईल. व्याजदर कमी केल्यामुळे खर्च कमी होईल आणि त्‍यामुळे वस्तूंच्या किंमतीही कमी होतील आणि ग्राहकांना मोठा दिलासा मिळेल. रोजगार वाढल्‍यामुळे निश्चितपणे व्यवसायातदेखील वृद्धी होईल, असा विश्वास कानडे यांनी व्यक्त केला आहे.

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे भाजपाकडून सातत्याने यासंदर्भात पाठपुरावा करण्यात आला, असे मिलिंद कानडे म्‍हणाले.

व्याजाचे दर कमी झाल्यामुळे आणि शिथिल करण्‍यात आलेल्‍या अटींमुळे व्यापाऱ्यांना उद्योगांसाठी मुबलक प्रमाणात कच्चा माल कमी किंमतीत उपलब्ध करुन देण्यात मदत होईल.

व्‍यापाऱ्यांचा एमएसएमईमध्‍ये समावेश करण्‍यात आल्‍यामुळे व्यापारी वर्गात समाधानाचे आणि आनंदाचे वातावरण पसरले आहे. आता व्यापारी एमएसएमई प्रवर्गात येणार असून बँक आणि वित्तीय संस्थांकडून प्राधान्य क्षेत्रातील कर्जाच्या अंतर्गत आवश्यक ते अर्थसहाय्य घेण्यास सक्षम ठरतील. याशिवाय, एमएसएमई प्रवर्गाला मिळणारे शासकीय योजनांचे लाभ व्यापाऱ्यांनादेखील घेता येतील. कोविड या साथीचा रोगामुळे प्रभावित झालेले देशभरातील व्यवसाय / व्यापारी आता बँकेचे सहाय्य घेऊन त्यांचे व्यवसाय प्रभावीपणे पुनर्संचयित करण्यास सक्षम ठरतील, असे त्यांनी म्हटले आहे.

 

 


Tags: MSMENitin Gadkariprime minister narendra modiएमएसएमईनितीन गडकरीपंतप्रधान नरेंद्र मोदीमिलिंद कानडे
Previous Post

ओबीसी-दलित नेते त्यांच्या समाजासाठी, मराठा नेते नेमके कुणासाठी?

Next Post

“राफेल घोटाळ्याची संयुक्त संसदीय समितीमार्फत चौकशी करा!”: नाना पटोले

Next Post
nana patole

"राफेल घोटाळ्याची संयुक्त संसदीय समितीमार्फत चौकशी करा!": नाना पटोले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!