Monday, September 28, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

प्रत्यक्ष कर व्यवस्थेत ‘एक देश एक कर’ लागू व्हावे – सीए चंद्रशेखर चितळे

December 17, 2022
in घडलं-बिघडलं
0
ICAI

मुक्तपीठ टीम

“सामान्य करदात्यांच्या हितासाठी प्रत्यक्ष कर व्यवस्थेतही ‘एक देश एक कर’ लागू करावा. त्यातून करदात्यांना कर भरण्यात येणाऱ्या समस्या सुटतील. तसेच करदात्यांना भरलेल्या करातून निवृत्ती वेतन देण्याचे धोरण राबवावे,” असे मत दि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाच्या (आयसीएआय) केंद्रीय समितीचे सदस्य सीए चंद्रशेखर चितळे यांनी व्यक्त केले.
‘आयसीएआय’ डायरेक्ट टॅक्सेस कमिटी आणि आयसीएआय पुणे शाखेच्या संयुक्त विद्यमाने ‘प्रत्यक्ष कर’ या विषयावर आयोजित दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन सीए चंद्रशेखर चितळे यांच्या हस्ते झाले. कोथरूड येथील एमआयटी विश्वशांती विद्यापीठाच्या स्वामी विवेकानंद सभागृहात झालेल्या परिषदेत ५०० पेक्षा अधिक सनदी लेखापाल सहभागी झाले होते.
प्रसंगी ‘आयसीएआय’च्या वेस्टर्न इंडिया रिजनल कौन्सिलचे उपाध्यक्ष सीए यशवंत कासार, विभागीय समितीच्या सदस्य सीए ऋता चितळे, आयसीएआय पुणेचे अध्यक्ष सीए काशिनाथ पठारे, उपाध्यक्ष सीए राजेश अग्रवाल, सचिव सीए प्रितेश मुनोत, खजिनदार सीए प्रणव आपटे, सदस्य सीए सचिन मिनियार, सीए अमृता कुलकर्णी, सीए ऋषिकेश बडवे आदी उपस्थित होते.
‘टॅक्सेशन ऑफ फ्युचर्स अँड ऑप्शन्स’वर सीए अभिषेक झावरे, ‘बांधकाम क्षेत्रातील करप्रणालीत येणाऱ्या अडचणीं’वर सीए जगदीश पंजाबी, ‘प्राप्तिकर अपिलीय प्राधिकरणाची महत्वाचे निवाडे’ यावर सीए नरेंद्र जोशी व सीए अपूर्वा चांदक्कर, ‘रिट अधिकार व अलीकडील निवाडे’ यावर ऍड. कपिल गोयल, ‘टॅक्सेशन ऑफ पार्टनरशिप फर्म्स’वर सीए पारस सावला, ‘टॅक्सेशन ऑफ पार्टनरशिप फर्म्स टू कंपनीज अँड कंपनी टू एलएलपी’वर सीए विनिता कृष्णन यांनी मार्गदर्शन केले.
सीए चंद्रशेखर चितळे म्हणाले, “करदाते आणि सनदी लेखापालांना नवीन करप्रणालीची माहिती व्हावी, यासाठी इन्स्टिट्यूटतर्फे विविध सत्रे आयोजिली जातात. भारतीय सनदी लेखापालांना देशविदेशातही मोठ्या संधी आहेत. त्यामुळे इंग्लंड आणि कॅनडा सोबत ऑडिट करणेबाबत करार झाला आहे. कर प्रणाली अधिक सुलभ करण्यासाठी सातत्याने सूचना व पाठपुरावा केला जातो.”
सीए यशवंत कासार, सीए ऋता चितळे यांनीही मार्गदर्शन केले. सीए काशिनाथ पठारे यांनी प्रास्ताविकात ‘आयसीएआय’ पुणे शाखेच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली. सीए समीर लड्डा यांनी सूत्रसंचालन केले. सीए प्रितेश मुनोत यांनी आभार मानले.

Tags: CA Chandrashekhar ChitaleIndiaOne Nation One Taxएक देश एक करभारतसीए चंद्रशेखर चितळे
Previous Post

उपयोजित संशोधन, तंत्रज्ञानावर भर देण्याची गरज – डॉ. सैफुर रहमान

Next Post

एक मोर्चा महाराष्ट्रासाठी! मराठी अस्मितेसाठी!!

Next Post
एक मोर्चा महाराष्ट्रासाठी! मराठी अस्मितेसाठी!!

एक मोर्चा महाराष्ट्रासाठी! मराठी अस्मितेसाठी!!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!