मुक्तपीठ टीम
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीची रंगत आतापासूनच वाढत आहे. बऱ्याच काळापासून मौन बाळगून असलेल्या मायावती यांनीसुद्धा निवडणुकीच्या दृष्टीने महत्वाची पावलं उचलायला सुरुवात केली आहे. मात्र मायावतींचं प्रमुख लक्ष्य सत्ताधारी भाजपापेक्षा विरोधातील समाजवादी पार्टी दिसत आहे. त्यातही त्यांनी भाजपा सोडून सपात प्रवेश केलेल्या स्वामींवर जोरदार हल्ला चढवला आहे. त्यांनी सपासासाठी ठरवलेले ब्राह्मण, दलित आणि मुसलमान हे समीकरणही सपाच्या ओबीसी, दलित आणि मुसलमान या समीकरणाला छेद देणारे मानले जात आहे.
मायावतींनी सांगितली आंबेडकरवादाची व्याख्या
यावेळी बसपा प्रमुखांनी आंबेडकरी समाजाची व्याख्याही सांगितली. त्या म्हणाल्या, ‘जेव्हा आपण आंबेडकरवादाची चर्चा करतो, तेव्हा आपल्याला समजायला हवे, की ते कोणत्याही जाती विरोधात नव्हते तर ते जातीव्यवस्थेच्या विरोधात होते. ते ही वाईट व्यवस्था समूळ नष्ट करून समतावादी समाजाची निर्मिती करण्यासंदर्भात बोलत होते. यामुळे विरोधात असलेल्या उच्चवर्णीयांना सोबत घेऊन चालावे लागेल. समाजात एकोपा असेल, तरच समतावादी समाजाची निर्मिती होईल.
मायावतींचे ‘बीडीएम’ समीकरण सपाचे गणित बिघडवणार?
- मायावतींची बसपा सपाच्या बहुजन विरुद्ध ब्राह्मण या समीकरणाऐवजी सर्व समाजांना सोबत घेण्याचे समीकरण मांडत आहेत.
- मायावतींनी उच्च बंधुत्वाचा संदेश देत थेट उच्चवर्णीयांना साधण्याचेच संकेत दिले.
- इतकंच नाही तर यादरम्यान त्यांनी त्यांची पहिली यादीही जाहीर केली.
- यामध्ये मुस्लिम आणि ब्राह्मणांना सर्वाधिक तिकिटे देण्यात आली आहेत.
- ब्राह्मण, दलित आणि मुस्लिमांच्या ‘बीडीएम’ समिकरणावर त्या पुझे जात असल्याचे दिसत आहे.
- याचे कारण मायावतींच्या ‘बीडीएम’ समीकरणात सपाच्या ८५ टक्के भागच सामील आहे.
मायावतींनी १७ टक्के ब्राह्मणांना तिकिटे वाटली
- बहुजन समाज पक्षाने जाहीर केलेल्या पहिल्या यादीत मुस्लिमांपासून ब्राह्मणांना पूर्ण स्थान देण्यात आले आहे.
- पक्षाने जाहीर केलेल्या यादीत सुमारे १७ टक्के ब्राह्मणांना तिकीट देण्यात आले आहे.
- यापूर्वी २००७ मध्ये बसपा सत्तेत आल्यावर पक्षाने सुमारे २५ टक्के ब्राह्मण उमेदवारांना तिकीट दिले होते.
- या सूत्रावर तिचा पुन्हा एकदा विश्वास बसताना दिसत आहे.
- यावेळी ब्राह्मण मतदारांची भाजपवर नाराजी असल्याचेही वृत्त आहे.
- अशा स्थितीत बसपा प्रमुख मायावती नाराज मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत.
- त्यांनी पहिल्या यादीत ९ ब्राह्मण उमेदवारांना तिकीट दिले आहे.