मुक्तपीठ टीम
सरकारी दूरसंचार कंपनी बीएसएनएलने आपले तीन नवीन ‘डीएसएल ब्रॉडबँड’ प्लान लॉन्च केले आहेत. हे नवे प्लान २९९ रुपये, ३९९ रुपये आणि ५५५ रुपयांचे आहेत. या सर्व प्लानमध्ये युजर्सना १० एमबीपीएस वेगाचा डेटा मिळेल. त्याचबरोबर हे ब्रॉडबँड प्लान १ मार्चपासून युजर्ससाठी उपलब्ध होणार आहेत.
२९९ रुपयांचा प्लान
- या प्लानमध्ये ग्राहकांना १० एमबीपीएसच्या वेगाने १०० जीबी डेटा मिळेल.
- तसेच कोणत्याही नेटवर्कवर अमर्यादित कॉलिंग करता येईल.
- हा प्लान ६ महिन्यांसाठी खरेदी केला जाऊ शकतो त्यासाठी नवीन युजर्सना ५०० रुपयांचे सिक्युरिटी डिपॉझिट ठेवावे लागेल.
३९९ रुपयांचा प्लान
- या प्लानमध्ये ग्राहकांना १० एमबीपीएसच्या वेगाने २०० जीबी डेटा मिळेल.
- तसेच कोणत्याही नेटवर्कवर अमर्यादित कॉलिंग करण्याची सुविधा मिळेल.
- किमान एक महिन्यासाठी युजर्सना प्लान सबस्क्राइब करावा लागेल, त्यासाठी ५०० रुपये जमा करावे लागतील.
५५५ रुपयांची ब्रॉडबँड योजना
- या प्लानमध्ये युजर्सना १० एमबीपीएस वेगाने ५०० जीबी डेटा मिळेल.
- यासोबतच अमर्यादित कॉलिंगची सुविधा मिळेल.
- हा प्लान दीर्घ कालावधीसाठी सबस्क्राइब करता येऊ शकतो.
- हा प्लान विद्यमान युजर्सना आणि नव्या युजर्ससाठी उपलब्ध असणार आहे.