मुक्तपीठ टीम
सरकारी दूरसंचार कंपनी बीएसएनएलला देशात इनमारसॅटची ग्लोबल एक्सप्रेस (जीएक्स) मोबाईल ब्रॉडबँड सेवा देण्याचा परवाना मिळाला आहे. ब्रिटनची मोबाईल सॅटेलाइट कम्युनिकेशन कंपनी इनमारसॅटने तशी घोषणा केली आहे. त्यामुळे आता भारतीय विमान कंपन्यांच्या विमान उड्डाणादरम्यान तसेच जहाजांमध्येही मोबाइल फोन सेवा उपलब्ध असणार आहे.
याचा आपल्याला कसा फायदा?
- बीएसएनएलला आता इनमारसॅट टर्मिनलचा वापर करून विमान कंपन्या आणि जहाजांसाठी हाय-स्पीड कनेक्टिव्हिटी सेवा पुरवणे शक्य होईल.
- सर्व भारतीय ग्राहकांना जीएक्स सेवा उपलब्ध असेल.
- याचा अर्थ असा की भारतीय विमानसेवा देश आणि परदेशात इन-फ्लाइट कनेक्टिव्हिटीसाठी जीएक्स वापरू शकतील.
- जीएक्स सेवा सुरू झाल्यामुळे, भारतीय देशांतर्गत विमान कंपन्या आणि आंतरराष्ट्रीय विमान कंपन्या उड्डाण दरम्यान देशभरात हाय-स्पीड कनेक्टिव्हिटी पुरवू शकतील.
आता प्रवासा दरम्यान काय शक्य?
- इनमारसॅट इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक गौतम शर्मा यांनी याबद्दल माहिती दिली आहे.
- यासेवेमुळे ५० एमबीपीएस क्षमतेची डेटा कनेक्टिव्हीटी मिळेल.
- याव्यतिरिक्त, प्रवासी इंटरनेटचा वापर करू शकतील, सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर प्रवेश करू शकतील आणि ई-मेल सहज पाठवू शकतील. एवढेच नाही तर ते फ्लाइट दरम्यान अॅपद्वारे कॉल करू शकतील.
- बीएसएनएलचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक पीके पुरवार म्हणाले की, या सेवेचे शुल्क अद्याप निश्चित झालेले नाही.
- बीएसएनएल नोव्हेंबरपासून या सेवा पुरवण्यासाठी सज्ज होईल.
- ही सुविधा सरकार आणि इतर यूजर्सना दिली जाईल.