Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

बीएसएनएलची खासगीशी टक्कर, एकाच वेळी चार नवीन प्री-पेड प्लान केले लाँच!!

September 6, 2026
in चांगल्या बातम्या
0
BSNL

मुक्तपीठ टीम

भारत संचार निगम लिमिटेड म्हणजेच बीएसएनएलने एकाच वेळी चार नवीन प्री-पेड योजना सादर केल्या आहेत. बीएसएनएलच्या या प्लानच्या किंमती १८४, १८५, १८६ आणि ३४७ रुपयांपर्यंत आहेत. या प्लानसह, ग्राहकांना हाय-स्पीड डेटासह अमर्यादित कॉलिंग आणि विनामूल्य एसएमएस मेसेज सेवा मिळतील. बीएसएनएलचे हे प्लान स्पेशल टॅरिफ व्हाउचर अंतर्गत सादर करण्यात आले आहेत. टेलीकॉमटॉकने सर्वप्रथम बीएसएनएलच्या या प्लानची माहिती दिली आहे.

 

बीएसएनएलचे फायदे

  • १८४ रुपयांच्या प्लानमध्ये तुम्हाला सर्व नेटवर्कवर अमर्यादित कॉलिंग आणि १ जीबी डेटा दररोज मिळेल.
  • या प्लानची वैधता २८ दिवसांची आहे. यामध्ये दररोज १०० एसएमएसची सुविधाही मिळणार आहेत.
  • १८५ रुपयांच्या प्लानची वैधता देखील २८ दिवसांची आहे.
  • या प्लानमध्येही सर्व नेटवर्कवर अमर्यादित लोकल, एसटीडी कॉलिंग उपलब्ध असेल. या प्लानमध्ये दररोज १०० एसएमएस सुविधाही मिळणार आहे.
  • यामध्ये अरेना मोबाईल गेमिंगची सेवाही २८ दिवस उपलब्ध असेल.
  • १८६ रुपयांच्या प्लानमध्ये सर्व नेटवर्कवर अमर्यादित कॉलिंग सुविधा देखील उपलब्ध आहे.
  • यामध्येही दररोज १ जीबी डेटा मिळणार आहे. या प्लानची वैधता २८ दिवसांची आहे.
  • हार्डी गेम सेवा या योजनेसह उपलब्ध आहे.
  • बीएसएनएल ३४७ रूपयांच्या प्लानमध्ये दररोज १०० एसएमएससह २जीबी डेटा देखील मिळेल.
  •  या प्लानची वैधता ५६ दिवसांची आहे. यामध्ये देखील एरिना मोबाईल गेमिंग सेवा ५६ दिवसांच्या वैधतेसह उपलब्ध असेल.

 

अलीकडेच बीएसएनएलने म्हटले आहे की, इतर कोणत्याही नेटवर्कवरून त्यांच्या नेटवर्कवर येणाऱ्या ग्राहकांना ५ जीबी डेटा विनामूल्य मिळेल. या मोफत डेटाची वैधता ३० दिवसांची असेल. फ्री डेटासाठी एक अट अशी आहे की, तुम्हाला सोशल मीडियावर बीएसएनएलच्या नेटवर्कमध्ये एमएनपी करण्याचे कारण द्यावे लागेल आणि कंपनीचा पुरावा पाठवावा लागेल.

 

बीएसएनएलच्या या नवीन मोफत डेटा ऑफरची मुदत आता संपली असल्याचे कळते. मात्र, लवकरच बीएसएनल अशा आणखी चांगल्या ऑफर सादर करणार असल्याचे कळते. तशा काही ऑफर त्यांच्या वेबसाइटवर तपासल्याही जाऊ शकतात.

पाहा व्हिडीओ:

 


Tags: Bharat Sanchar Nigam LimitedBSNLfree SMS messaging servicegood newsHigh-speed datamuktpeethPre-Paid PlanSwitchToBSNLunlimited calling serviceअमर्यादित कॉलिंग सेवाचांगल्या बातम्याप्री-पेड प्लानबीएसएनएलभारत संचार निगम लिमिटेडमुक्तपीठविनामूल्य एसएमएस मेसेज सेवाहाय-स्पीड डेटा
Previous Post

मुंबईतील सहा किल्ल्यांचा विकास, जतन आणि संवर्धनासाठी खास प्रयत्न

Next Post

वनप्लस Z2 इयरबड्सचा मोठा स्टॅमिना, १० मिनिटांचं चार्जिंग, ५ तास चालणार!

Next Post
वनप्लस

वनप्लस Z2 इयरबड्सचा मोठा स्टॅमिना, १० मिनिटांचं चार्जिंग, ५ तास चालणार!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!