मुक्तपीठ टीम
भारतात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार माजवला आहे. रोजच मोठ्या प्रमाणात नव्या रुग्णांची वाढ होत आहे. राज्य आणि केंद्राकडून संसर्ग रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. पण रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहेत. त्यामुळे तज्ज्ञ अभ्यासक जगभरातील वेगवेगळ्या देशांच्या कोरोना रोखणाऱ्या मॉडेलचा अभ्यास करत आहेत. सध्या तरी अनेकांना ब्रिटनने वापरलेले कडक लॉकडाऊनसह जलद लसीकरणाचे मॉडेल सर्वात योग्य वाटत आहे.
युरोपात वाढला, ब्रिटनमध्ये घटला!
- जगभरात सर्वाधिक संक्रमित देशांमध्ये ब्रिटन शीर्ष स्थानावर होते. त्याच ब्रिटनमध्ये नव्या संसर्गाबरोबरच मृत्यूतही घट झाल्याचे निदर्शनास आले आहे. जानेवारीपासून ब्रिटनमधील नवीन रुग्णांमध्ये ९० टक्क्यांनी घट झाली आहे.
- चालू वर्षांच्या सुरुवातीला ब्रिटनमध्ये दररोज ५० हजारांहून अधिक रुग्ण आढळत होते.
- फेब्रुवारीनंतर युरोपमध्ये कोरोनाची नवीन लाट आली तर त्याच वेळी ब्रिटनमध्ये कोरोनाची नवीन प्रकरणे दोन तृतियांशाने घट झाली आहे.
- कोरोनाच्या सुरूवातीच्या काळात सर्वाधिक रुग्ण ब्रिटनमध्ये आढळून येत होते.
- पद्धतशीर टप्प्याने केले जाणारे लॉकडाऊन आणि जलद लसीकरणामुळे संसर्ग आणि मृत्यूची साखळी तोडण्यास ब्रिटन सरकार यशस्वी ठरला आहे.
आतापर्यंत लसीकरणाची स्थिती
• ब्रिटनमध्ये १४ डिसेंबर २०२० पासून लसीकरणास सुरुवात केली होती.
• आतापर्यंत येथील ४८ टक्क्यांपेक्षा जास्त लोकांना प्रथम डोस देण्यात आला आहे.
• लंडनमध्ये गेल्या काही दिवसात एकही रुग्ण आढळला नसल्याने येथे अनलॉक प्रक्रियेला सुरुवात झाली आहे.
• लसीविषयीच्या काहींच्या तक्रारींमुळे लसीकरण थांबवले नाही
• त्यामुळे आज ब्रिटनने संसर्गावर नियंत्रण मिळवण्यात यश मिळवले आहे.
नियोजनबद्ध लॉकडाऊन फळले!
• ब्रिटनचे पंतप्रधान जॉनसन यांनी ४ जानेवारी २०२१ ला पुढील ६ महिन्यांसाठी नवे नियमांची घोषणा केली होती.
• नियमांनुसार टप्प्यांचीही स्थिती स्पष्ट केली होती.
• त्यांनी म्हटले होते की, ८ मार्चपासून सर्व शाळा खुल्या केल्या जातील.
• २९ मार्चपासून ६ जण एकत्र बाहेर जाण्याची परवानगी देण्यात आली.
• १२ एप्रिलपर्यंत सरसकट सर्व दुकाने उघडली जातील.
• २१ जूनपासून सर्व कायदेशीर बंधने हटवण्यात येतील.
• इतर देशांप्रमाणे ब्रिटनमध्ये ही लॉकडाऊनला लोकांनी विरोध दर्शविला होता.
• जानेवारी महिन्यात नवीन मार्गदर्शक सुचना जारी केल्यानंतरही विरोध झाला पण नियोजनबंद्ध सर्व लोकांना कधी काय उघडेल याची माहिती दिल्यामुळे सर्वानी नियमांचे पालन केले.