मुक्तपीठ टीम
ब्राझिलमध्ये कोरोनाचा हाहाकार पाहायला मिळतोय. कोरोनाग्रस्त मृतांचा आकडा इतका वाढतोय की मृतदेह पुरण्यासाठी जागा कमी पडतेय. त्यामुळेच आता दफन केलेल्या जागेतून सांगाडे बाहेर काढून मृतदेह पुरण्यास जागा तयार केली जात आहे. एका दफनभूमीतून जवळपास १ हजार सांगाडे काढले गेले आहेत.
दक्षिण अमेरिकेत कोरोनाग्रस्त मृतांचा आकडा ३ लाख २५ हजारांपर्यंत पोहोचलाय. सालो पालो हे जगातील सर्वात दाट लोकवस्ती असलेलं शहर. या शहरातल्या नवीन काशोइरिन्हा दफनभूमीची छायाचित्र डोळ्यात अश्रू तरळतात. तिथे कर्मचारी नवीन मृतदेह पुरण्यासाठी जुने सांगाडे बाहेर काढतायत. ब्राझिलमधली सर्वात मोठी दफनभूमी व्हिला फॉर्मोसा सीमेट्रीमध्ये, कर्मचारी मास्क आणि पीपीई किट परिधान करून दिवस-रात्र मृतदेह पुरण्यासाठी जागा रिकामी करतायत.
अमेरिकेनंतर ब्राझिलमध्ये कोरोनाचं सर्वाधिक संक्रमण झालं आहे. मार्च महिन्यातच ब्राझिलमध्ये जवळपास ६६ हजार लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय.