मुक्तपीठ टीम
एकीकडे माणसांना कोरोना व्हायरस पीडतोय तर दुसरीकडे धोकादायक व्हायरसचा एक नवीन प्रकार BRATA (ब्राझिलियन रिमोट ऍक्सेस टूल, अँड्रॉइड) हा अँड्रॉइड यूजर्सच्या स्मार्टफोनचा सर्व डेटा आणि बँक तपशील चोरत आहे. एवढ्यावर न थांबता तो फोन फॅक्टरी रीसेट करत आहे. त्यामुळे सावधान राहीलेच पाहिजे. हा एक मोठा धोका आहे.
BRATA या व्हायरसबद्दल थोडक्यात
- बऱ्याच काळापासून, BRATA नावाचा बँकिंग फ्रॉड ट्रोजन अँड्रॉइड यूजर्सना लक्ष्य करत आहे.
- यूजर्सचे फोन हॅक करत बँक तपशील चोरत आहे.
- कॉम्प्युटर सिक्युरिटी फर्म क्लीफीच्या नवीन सुरक्षा संशोधन अहवालानुसार, गेल्यावर्षी डिसेंबरपासून या मालवेअरचा एक नवीन प्रकार आला आहे.
- पुढे तो तुमचा स्मार्टफोन फॅक्टरी रीसेट करुन सर्व डेटा काढून टाकतो.
- BRATA चे नवीन प्रकार GPS आणि कीलॉगिंग देखील ट्रॅक करू शकते.
- म्हणजेच, मालवेअर यूजर्सचे स्थान ट्रॅक करू शकतो तसेच त्यांच्या अॅक्टीव्हिटीच्या आधारे डेटामध्ये प्रवेश करू शकतो.
- अहवालात म्हटले आहे की ब्रॅटा सुरुवातीपासून बँकिंग ट्रोजन आहे.
- यूजर्सच्या अँड्रॉइड डिव्हाइसवर प्रवेश करू शकतो आणि ई-बँकिंग अॅप्सद्वारे त्यांचे पैसे देखील चोरू शकतो.
- सध्या हा व्हायरस ब्राझिल, ब्रिटन, पोलंड, इटली, स्पेन, चीन आणि लॅटिन अमेरिकेत सक्रिय आहे.
धोका टाळण्याचे उपाय
- तुम्ही अँड्रॉइड फोन वापरत असाल, तर तुम्ही थर्ड पार्टी अॅप स्टोअरमधून अॅप्स डाउनलोड करणे टाळावे.
- तुम्ही प्ले स्टोअरवरून एखादे अॅप डाऊनलोड करत असाल तर तुम्ही त्याद्वारे विचारलेल्या परवानगीकडे लक्ष द्या.
- हे तुमचे डिव्हाइस अपडेट ठेवेल.
- संभाव्य धोके टाळण्यासाठी ते नियमितपणे स्कॅन देखील करेल.
- तथापि अँटी-मालवेअर सॉफ्टवेअर नेहमीच यशस्वी होत नाही.
- हेच कारण आहे की तुम्ही कसून पडताळणी केल्यानंतरच कोणतेही थर्ड पार्टी अॅप डाउनलोड करावे.