मुक्तपीठ टीम
बाउन्स इन्फिनिटी ईव्ही चार्जिंगसाठीच्या आपल्या उर्जा पायाभूत सुविधा नेटवर्कवर खूप वेगान काम करत आहे. आता या नेटवर्कमध्ये १० लाखांहून अधिक बॅटरी स्वॅप्सची नोंदणी गाठली गेली आहे. बॅटरी स्वॅप्स म्हणजे ई-वाहनांच्या बॅटरींची अदलाबदली करणे. इलेक्ट्रिक वाहनाची संपलेली बॅटरी चार्जिंग स्थानकावर देऊन त्याबदली पूर्णतः चार्ज असलेली बॅटरी घेणे शक्य झाल्याने चार्जिंगसाठी लागणारा वेळ वाचतो. त्यामुळे स्वाभाविकच लोकांचा कल ई-वाहनांकडे वाढू लागेल. बाऊन्सच्या या पायाभूत सुविधेमुळे पुढील १२ ते १४ महिन्यांत दहा लाखांहून अधिक स्कूटर्सना पाठबळ मिळणार आहे. कंपनीने यासाठी संशोधन आणि विकास, उत्पादन आणि पायाभूत सुविधांचा संपूर्ण भारतात विस्तार करण्यासाठी १०० दशलक्ष डॉलर्सची गुंतवणूक करण्याचे ठरवले आहे.
दहा लाख ईव्ही बॅटरी स्वॅप्सचा टप्पा पार करणे हा एक मैलाचा टप्पा आहे. या मैलांच्या टप्प्यामुळे बाउन्स ही भारतीय उर्जा पायाभूत सुविधा क्षेत्रातील एवढी लक्षणीय कामगिरी साध्य करून दाखविणारी देशातील पहिलीच कंपनी बनली आहे. कंपनीकडे असलेल्या तांत्रिक कौशल्याची आणि परिवहन सर्वांसाठी किफायतशीर आणि आवाक्यातले बनविण्याच्या कंपनीच्या बांधिलकीची ही पोचपावतीच आहे.
इन्फीनिटीची स्वॅपिंग स्थानके (swapping stations) ही इंधन पुरवठा स्थानकांच्या धर्तीवरच काम करणार आहेत. इन्फीनिटी बॅटरी स्वॅपिंग स्थानकांवर पूर्णपणे चार्ज असलेल्या आणि त्वरित घेऊन जाण्यास सज्ज असलेल्या बॅटरीज ठेवलेल्या असतील, ज्या ग्राहक आपल्या जवळपास संपत आलेल्या बॅटरीच्या बदल्यात अवघ्या काही मिनिटांत घेऊन जाऊ शकतील. या पायाभूत सुविधेच्या उपलब्धीमुळे ग्राहकांना आता आपल्या स्कूटरची बॅटरी चार्ज करण्यासाठी तिष्ठत वाट बघत थांबावे लागणार नाही किंवा दुचाकी आणखी किती अंतर काटू शकेल याची चिंता राहणार नाही अथवा बॅटरी चार्ज करायचे कटाक्षाने लक्षात ठेवण्याची देखील आवश्यकता राहणार नाही.
बाउन्स ही आपल्या नुकत्याच सादर करण्यात आलेल्या बाउन्स इन्फीनिटी ई वन (Bounce Infinity E1) या कन्झ्युमर इलेक्ट्रिक स्कूटरच्या अनुषंगाने आपल्या बॅटरी स्वॅपिंग नेटवर्कचा मोठ्या प्रमाणात विस्तार करण्याच्या मार्गावर आहे. ही स्कूटर डिसेंबरमध्ये सादर करण्यात आली असून ‘बॅटरी एक सेवा’ (‘Battery as a service’) हा पर्याय पुरविणारी ही भारतीय बाजारपेठेतील एकमेवाद्वितीय कंपनी ठरली आहे. यामुळे स्कूटरसाठीचा कामकाजी खर्च (रनिंग कॉस्ट) लक्षणीय प्रमाणात कमी होणार असून पारंपरिक स्कूटरच्या तुलनेत खर्चात जवळपास ४०% एवढी प्रचंड बचत होऊ शकणार आहे. बाउन्स इन्फीनिटी ई वनसोबत एक बॅटरी मिळणार असून ती स्कूटरमधून वेगळी काढून ग्राहक आपल्या घरी अथवा ऑफिसमध्ये किंवा जिथे सोयीचे असेल अशा कुठल्याही ठिकाणी नेऊन चार्जिंग करू शकतात.
नवीन साध्य झालेल्या टप्प्याबद्दल बोलताना, बाउन्सचे सह-संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. विवेकानंद हल्लकेरे म्हणाले, “नुकत्याच जाहीर झालेल्या अर्थसंकल्पात करण्यात आलेली कणखर बॅटरी स्वॅपिंग धोरण राबविण्याची घोषणा ही आम्ही बाउन्सकरीता प्रणेते होऊन सर्वप्रथम राबविलेला मार्ग सुयोग्य असण्याला पुष्टी देणारी आहे. बॅटरी स्वॅपिंग आणि बॅटरी एक सेवा (‘Battery as a service’ – BaaS) हे भारतात ईव्ही वाहनांच्या स्वीकाराला वेगवान चालना देणारे सर्वाधिक प्रभावी उपयोजन असल्याचे सरकार आणि धोरणकर्ते यांच्या लक्षात आलेले आहे. बॅटरी स्वॅपिंग बाबत बाउन्स इन्फीनिटी प्रणेती असून तिने अतिशय प्रभावीपणे भारतातील अदलाबदली करण्याजोग्या बॅटरीच्या पायाभूत सुविधा क्षेत्रात क्रांती घडवून आणलेली आहे.”
आमच्या वितरण नेटवर्क धोरणाचे ग्राहकांना बहुविध फायदे मिळणार आहेत, ज्यामध्ये प्रत्येकवेळी संपूर्णपणे चार्ज्ड असलेली बॅटरी आपल्या नजीकच्या, आवाक्यातील ठिकाणी अत्यंत सुलभतेने मिळविण्याच्या लाभाचा समावेश आहे. चार्जिंगसाठी पायाभूत सुविधा उभारणी करण्याच्या व्यावहारिक मुद्द्याचा – जसे की विवक्षित चार्जिंग स्थानकासाठी असणारी शहरी भागातील जागेची चणचण – देखील विचार केला गेला असल्याने किफायतशीर आणि स्वच्छ परिवहनाची आम्ही रुजवात करू शकणार आहोत.
बाउन्सने पायाभूत सुविधा पाठबळ उभारणीसाठी नुकताच नोब्रोकर(Nobroker), पार्क प्लस (Park+), रेडी असिस्ट (Readyassist), किचन्स (Kitchens@) हॅलोवर्ल्ड (HelloWorld), गुडबॉक्स (Goodbox) इत्यादींसोबत करार केला असून पुढील १२ ते २४ महिन्यात दहा लाखांहून अधिक स्कूटर्सना त्याचा लाभ मिळणार आहे. हे स्मार्ट उपयोजन निवासी संकुले, पेट्रोल स्थानके, रेस्टॉरंट्स, कॅफेज, सहनिवास संकुले, कॉर्पोरेट कार्यालये, किराणा दुकाने इत्यादी बहुविध ठिकाणी उपलब्ध करून दिले जाणार असल्यामुळे ग्राहकांना आपल्या सोयीच्या सर्वात जवळच्या स्वॅपिंग स्थानकापर्यंत पोचणे अगदी सहज शक्य होणार आहे.
देशात ईव्ही वाहनांचा स्वीकार आणखी जलदगतीने व्हावा, अंतर्गत अदलाबदलीला पाठींबा मिळावा या दृष्टीने बाउन्स अन्य ओईएम प्लेयर्ससोबत आपल्या बॅटरी स्वॅपिंग मधील कौशल्य आणि अव्वलतेची वाटणी करण्याबाबत चाचपणी करत आहे.
About Bounce:
With a strong desire and determination to address the need to bring ease of commuting to people across many categories like small businesses, college students, workers and delivery agents, Bounce was launched in 2018. With first-of-its-kind, indigenously built using in-house R&D, Bounce dockless bikes were launched in Bengaluru in May 2018. A blend of advanced digital solutions with a seamless operations network on the ground helped Bounce become a popular and desired mode of transport across diverse economic and age groups.
In December 2021, Bounce announced the launch of its consumer electric scooter and battery swapping network under the brand name – Bounce Infinity. Bounce has committed USD 100 million for R&D, manufacturing of e-scooters and expanding the battery swapping infrastructure across India.
Bounce is backed by marquee investors such as Accel, Accel US, Sequoia Capital India, B Capital, Falcon Edge, Qualcomm, Chirate, Omidyar Network, Maverick Capital etc; and has raised over USD 220 M.