मुक्तपीठ टीम
कोरोना विरूद्धच्या लढ्यात संपूर्ण जगात लसीकरण मोहिमेला वेग आला आहे. अमेरिकेतही मोठ्या प्रमाणात लसीकरण झाले आहे. याच पाश्वभूमीवर अमेरिकेत रोग नियंत्रण आणि प्रतिबंध केंद्राकडून (सीडीसी) मास्क आणि सोशल डिस्टसिंग संबंधित नव्या मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहे. यानुसार ज्यांनी दोन्ही लसींचे डोस घेतले आहेत, अशांसाठी मास्क आणि सोशल डिस्टंसिंगच्या नियमात शिथिलता देण्यात आली आहे. असे लोक आता कामावर जाऊ शकतील. सीडीएसच्या या मार्गदर्शक सूचनांचे राष्ट्राधक्ष्य जो बायडेन यांनी स्वागत केले आहे.
अमेरिकेतील सीडीएसच्या मार्गदर्शक सूचना
• ज्यांनी दोन्ही लसींचे डोस घेतले आहेत, अशांसाठी मास्क आणि सोशल डिस्टंसिंगच्या नियमात शिथिलता देण्यात आली आहे.
• दोन्ही डोस घेतलेले लोक आता कामावर जाऊ शकतील.
• ज्यांचे अद्याप पूर्ण पूलसीकरण झाले नाही अशांनी मात्र कोरोना नियमांचे पालन करावे लागणार आहे.
आता पर्यंत अमेरिकेत मोठ्या प्रमाणात लसीकरण करण्यात आले आहे. ही कामगिरी ११४ दिवसात पार पाडण्यात आली आहे. आता अमेरिकेचे लक्ष्य हे लहान मुलांचे लसीकरण करण्याचे आहे, जेणेकरून ते ही पुन्हा शाळेत जाऊ शकतील.
अमेरिकेने कोरोना लसीकरणात जगाचं नेतृत्व केलं – जो बायडेन
• व्हाईट हाऊसमध्ये बोलताना बायडन यांनी सांगितलं की, “सीडीसीने आपण पूर्ण लसीकरण केलेल्या लोकांना आता मास्क घालण्याची गरज नसल्याची शिफारस केली आहे.
• ही शिफारस योग्य आहे. आता हे नियम घरात किवा घराबाहेर दोन्हीकडे लागू आहे.
• मला वाटतं हा महत्वाचा टप्पा आहे.
• एक मोठा दिवस असून नागरिकांचं लवकरात लवकर लसीकरण केल्यानेच हे यश संपादन करण्यात आले.
• गेल्या १४४ दिवसांपासून आपण लसीकरण करत असून जगाचं नेतृत्व केलं आहे.
• संशोधक, शास्त्रज्ञ, औषध कंपन्या, लष्कर, फेमा, डॉक्टर्स, परिचारिका, द नॅशनल गार्ड, गव्हर्नर अशा अनेकांच्या मेहनतीमुळे हे शक्य झालं आहे.
• बायडन यांनी यावेळी अद्यापही लसीकरण न झालेल्यांना मास्क घालण्याची गरज असल्याचं स्पष्ट केलं आहे.