मुक्तपीठ टीम
सीमा सुरक्षा दलात आर्किटेक्ट इंस्पेक्टर या पदासाठी ०१ जागा, सब इंस्पेक्टर वर्क्स या पदासाठी ५७ जागा, इलेक्ट्रिकल ज्युनियर इंजिनीअर/ सब इंस्पेक्टर या पदासाठी ३२ जागा अशा एकूण ९० जागांवर ही भरती होणार आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, ०६ जून २०२२ पर्यंत अर्ज करु शकतात. नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत आहे.
शैक्षणिक पात्रता
अर्ज करणारा उमेदवार,
- पद क्र.१- आर्किटेक्चर पदवी
- पद क्र.२- सिव्हिल इंजिनीअरिंग डिप्लोमा
- पद क्र.३- इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग डिप्लोमा केलेला असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय ३० वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे.
शुल्क
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या जनरल/ ओबीसी उमेदवारांकडून १०० रूपये शुल्क आकारले जाणार, तर एससी/ एसटी/ ईएक्सएसएम उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.
अधिक माहितीसाठी सीमा सुरक्षा दलाच्या अधिकृत वेबसाइट http://bsf.gov.in/ वरून माहिती मिळवू शकता.