मुक्तपीठ टीम
भारतीय रेल्वे कॅटरिंग अॅन्ड टुरिझम कॉर्पोरेशनने (आयआरसीटीसी) आपली ऑनलाइन बस बुकिंग सेवा सुरू केली आहे. ही सेवा २९ जानेवारीपासून सुरू झाली आहे. भारतीय रेल्वे कॅटरिंग अॅन्ड टुरिझम कॉर्पोरेशन हळूहळू देशाचे पहिले सरकारी ‘वन स्टॉप शॉप ट्रॅव्हल पोर्टल’ म्हणून विकसित होत आहे.
‘ग्राहकांना अधिकाधिक आणि उत्तम दर्जाच्या प्रवासाचा अनुभव मिळावा यासाठी आयआरसीटीसी काही वेगळ्या सेवा पुरवते. ऑनलाईन रेल आणि फ्लाइट तिकिट बुकिंगच्या व्यवसायात असलेल्या भारतीय रेल्वे कॅटरिंग अॅन्ड टुरिझम कॉर्पोरेशनने आपली ऑनलाइन बस बुकिंग सेवा सुरू केली आहे. ही सेवा२९ जानेवारी २०२१ रोजी सुरु झालीय.
भारतीय रेल्वे कॅटरिंग अॅन्ड टुरिझम कॉर्पोरेशनच्या ऑनलाइन बस बुकिंग सेवेची अधिक माहिती https://www.bus.irctc.co.in/home या वेबसाइटवर मिळेल. कंपनीच्या मोबाइल अॅपवर मार्चच्या पहिल्या आठवड्यात ही सेवा उपलब्ध होईल अशी अपेक्षा आहे. त्यानंतर, लोक मोबाइल अॅपद्वारे बसची तिकिटेदेखील बुक करू शकतील.
कंपनीच्या निवेदनानुसार, भारतीय रेल्वे कॅटरिंग अॅन्ड टुरिझम कॉर्पोरेशनने ग्राहकांना ऑनलाईन बस बुकिंग सेवा देण्यासाठी ५०,००० हून अधिक खासगी बस ऑपरेटरशी करार केला आहे. राज्य रस्ते वाहतूक महामंडळांचाही समावेश आहे. त्यामुळे या पोर्टवरवर आता २२ राज्ये आणि तीन केंद्रशासित प्रदेशांची बुकिंग उपलब्ध असेल,
ऑनलाइन बस बुकिंगच्या या नव्या सुविधेद्वारे ग्राहकांना विविध प्रकारच्या बस सेवा उपलब्ध होऊ शकतात. याद्वारे, ग्राहक त्यांचे पिक-अप आणि ड्रॉप पॉईंट आणि वेळ निवडू शकतात. त्यानंतर ग्राहक अस्तित्त्वात असलेल्या बँक आणि ई-वॉलेट सवलतीच्या सहाय्याने डिस्काउंट किंमतीवर बस सेवा बुक करू शकतात.
पाहा व्हिडीओ