Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

कोरोना व्यवस्थापनातील अनुभवांवरील “दी धारावी मॉडेल” पुस्तकाचे प्रकाशन

September 6, 2026
in घडलं-बिघडलं, चांगल्या बातम्या, सरकारी बातम्या
0
the dharavi model

मुक्तपीठ टीम

कोरोना रोखण्यात मुंबई महापालिकेने धारावी मॉडेल यशस्वी केले आहे. या यशस्वी प्रयत्नांतील अनुभव, साद्यंत माहितीचा आढावा घेणाऱ्या “दी धारावी मॉडेल” या पुस्तकाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. यावेळी मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा पर्यटन, पर्यावरण व  राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे उपस्थित होते. या पुस्तकाचे लेखक  किरण दिघावकर हे मुंबई महापालिकेचे सहायक आयुक्त आहेत.

 

वर्षा निवासस्थानी झालेल्या या प्रकाशनप्रसंगी लेखक श्री. दिघावकर यांच्यासह मुंबई महापालिकेचे आयुक्त आय. एस. चहल, अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी उपस्थित होते.

the dharavi model

लेखक श्री. दिघावकर यांनी या पुस्तकात धारावीमध्ये कोविड-19 विषाणू संसर्ग रोखण्यासाठी महापालिका प्रशासनाने केलेल्या उपाययोजना, प्रयत्नांची मांडणी केली आहे. या उपाययोजनांना जागतिक पातळीवर गौरवले गेले आहे. केंद्र सरकार, जागतिक बँक, जागतिक आरोग्य संघटनेकडून आणि विदेशातही धारावी मॉडेलचे कौतुक केले गेले आहे. धारावी मॉडेल म्हणून ही कार्यपद्धती अन्य देशांमधील अशा दाट लोकवस्तीच्या झोपडपट्टीमध्येही अवलंबण्यात येत आहे. कोविडच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेतही धारावी मॉडेलने आपले नाणे खणखणीत असल्याचे सिद्ध केले आहे.

 

धारावीतील कोविड व्यवस्थापन करताना श्री. दिघावकर यांना आलेले अनुभव आणि आठवणी यांचे हे पुस्तक स्वरुपातील संकलन आहे. इंग्रजीतील हे पुस्तक लवकरच मराठी आणि इतर भाषांमध्ये अनुवादीत स्वरुपात उपलब्ध होणार आहे. पुस्तक इ-बुक स्वरुपात देखील उपलब्ध करून देण्यात आले आहे. यामुळे जगाच्या कानाकोपऱ्यातील वाचकांना धारावी मॉडेल विस्तृत स्वरूपात जाणून घेणे शक्य होणार आहे.


Tags: Book launchCMO Maharashtracovid managementmuktpeeththe dharavi modelदी धारावी मॉडेलमुक्तपीठमुख्यमंत्री उद्धव ठाकरेमुंबई महापालिका
Previous Post

राज्याला शैक्षणिकदृष्ट्या अग्रेसर ठेवण्यासाठी उपाययोजना राबवल्या जाणार

Next Post

आता शहरी भागातही नवीन रास्त भाव धान्य दुकाने सुरू करता येणार

Next Post
ration shops

आता शहरी भागातही नवीन रास्त भाव धान्य दुकाने सुरू करता येणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!