Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

बॉलिवूड सुपरस्टार्स सुपरफ्लॉप! साऊथ स्टार्स सुपर हिट!!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं, मस्तच
0
Bollywood Movies

मुक्तपीठ टीम

सध्या आमिर खानचा ‘लाल सिंह चड्ढा’ आणि अक्षय कुमारचा ‘रक्षा बंधन’ हे चित्रपट बॉक्स ऑफिसवर चर्चेचा विषय ठरले आहेत. ‘लाल सिंह चड्ढा’ आणि ‘रक्षा बंधन’ यांना रिलीज होण्यापूर्वीच विरोध होत होता. साऊथच्या छोट्या बजेटच्या चित्रपटांसमोर आमिर आणि अक्षयचे दोन्ही चित्रपट कमाईच्या बाबतीत अपयशी ठरले आहेत. हे चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांची कमतरता दिसत आहे.

आमिर खानचा ‘लाल सिंह चड्ढा’ रिलीजपूर्वी बहिष्काराच्या मागणीमुळे चर्चेत होता, त्यामुळे आता या चित्रपटाच्या खराब प्रदर्शनामुळे सर्वांनाच आश्चर्य वाटत आहे. चार वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर आमिरच्या पुनरागमनाचा या चित्रपटासाठी कोणताही फायदा झालेला नाही. १८० कोटींमध्ये बनवलेल्या चित्रपटाचे कलेक्शन दिवसेंदिवस कमी होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चित्रपटाने केवळ २.५० कोटींचा व्यवसाय केला आहे. अशा परिस्थितीत सहा दिवसांनंतरही चित्रपटाची कमाई ५० कोटींचा टप्पा पार करू शकलेली नाही.

अक्षय कुमारचा या वर्षात तिसरा लॉंच होणारा ‘रक्षाबंधन’ चित्रपटालाही नुकसान सहन करावे लागत आहे आणि अशा परिस्थितीत त्याची बॉक्स ऑफिस कमाईही काही विशेष नाही आहे. सुरुवातीच्या आकडेवारीनुसार, सहा दिवसांनंतर चित्रपटाचे एकूण कलेक्शन ३६.५७ कोटी रुपये झाले आहे.

साऊथच्या छोट्या बजेटच्या चित्रपटांसमोर आमिर आणि अक्षयचे चित्रपट कमाईच्याबाबतीत नाकाम!!

कार्तिकेय २

  • चंदू मोंडेटी दिग्दर्शित ‘कार्तिकेय २’ रिलीज झाल्यापासून आमिर खानच्या ‘लाल सिंग चड्ढा’ला टक्कर देत आहे.
  • सुपरस्टार निखिल सिद्धार्थचा ‘कार्तिकेय २’ हा चित्रपट तेलुगुसोबतच हिंदी भाषेतही प्रदर्शित झाला असून, त्याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.
  • या चित्रपटाने ३.५० कोटींचा व्यवसाय केला आहे, जो आमिरच्या चित्रपटापेक्षा जास्त आहे.
  • ३० कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने चौथ्या दिवशी २१.६२ कोटींची कमाई केली आहे.

विरुमन

  • एम. मुथय्या दिग्दर्शित आणि लिखित, ‘विरुमन’ रिलीज झाल्यापासून अक्षय कुमारच्या ‘रक्षा बंधन’ला टक्कर देत आहे.
  • या दोन्ही चित्रपटांमध्ये दररोज बॉक्स ऑफिसवर टक्कर होत असते.
  • ‘विरुमन’ने पाचव्या दिवशी २ कोटींचा व्यवसाय केला आहे. त्याचवेळी, आता चित्रपटाची एकूण कमाई ३६.५७ कोटींवर गेली आहे.

नन ठान केस कोदू

  • रतिन बाला कृष्णन दिग्दर्शित नन ठान केस कोदू
  • या चित्रपटाच्या कमाईतही घट झाली आहे.
  • कुंचको बोबन स्टारर ‘नन ठान केस कोदू’ने एकूण कमाई ८.५२ कोटींवर गेली आहे.

सीता रामम

  • दुलकर सलमान आणि मृणाल ठाकूर यांच्या पॅन इंडिया चित्रपटाने आमिरच्या ‘लाल सिंग चड्ढा’लाही मागे टाकले आहे.
  • या चित्रपटाच्या प्रदर्शनाचा दुसरा आठवडा सुरू आहे, मात्र तरीही तो यशस्वी ठरत आहे.
  • ३० कोटींच्या बजेटमध्ये बनलेला हा चित्रपट फार पूर्वीपासूनच आपला खर्च वसूल करण्यात यशस्वी ठरला आहे.
  • त्याचवेळी, चित्रपटाचे एकूण कलेक्शन ३६.५६ कोटी रुपये झाले आहे.

Tags: Aamir KhanAkshay KumarBollywood MoviesBollywood SuperstarsLal Singh ChadhamuktpeethRaksha BandhanSouth Superstarअक्षय कुमारआमिर खानघडलं-बिघडलंबॉलिवूड चित्रपटबॉलिवूड सुपरस्टार्समस्तचमुक्तपीठरक्षा बंधनलाल सिंह चड्ढासाऊथ सुपरस्टार
Previous Post

रायगड किनाऱ्यावरील संशयास्पद बोटीत AK-47 बंदुका! बोट भरकटलेली असल्याचं उघड, तरीही हायअलर्ट!!

Next Post

काश्मिरात हैदोस घालणाऱ्या दहशतवाद्यांवर मालमता जप्तीची कारवाई

Next Post
Terrorist Adil House

काश्मिरात हैदोस घालणाऱ्या दहशतवाद्यांवर मालमता जप्तीची कारवाई

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!