मुक्तपीठ टीम
सध्या आमिर खानचा ‘लाल सिंह चड्ढा’ आणि अक्षय कुमारचा ‘रक्षा बंधन’ हे चित्रपट बॉक्स ऑफिसवर चर्चेचा विषय ठरले आहेत. ‘लाल सिंह चड्ढा’ आणि ‘रक्षा बंधन’ यांना रिलीज होण्यापूर्वीच विरोध होत होता. साऊथच्या छोट्या बजेटच्या चित्रपटांसमोर आमिर आणि अक्षयचे दोन्ही चित्रपट कमाईच्या बाबतीत अपयशी ठरले आहेत. हे चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांची कमतरता दिसत आहे.
आमिर खानचा ‘लाल सिंह चड्ढा’ रिलीजपूर्वी बहिष्काराच्या मागणीमुळे चर्चेत होता, त्यामुळे आता या चित्रपटाच्या खराब प्रदर्शनामुळे सर्वांनाच आश्चर्य वाटत आहे. चार वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर आमिरच्या पुनरागमनाचा या चित्रपटासाठी कोणताही फायदा झालेला नाही. १८० कोटींमध्ये बनवलेल्या चित्रपटाचे कलेक्शन दिवसेंदिवस कमी होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चित्रपटाने केवळ २.५० कोटींचा व्यवसाय केला आहे. अशा परिस्थितीत सहा दिवसांनंतरही चित्रपटाची कमाई ५० कोटींचा टप्पा पार करू शकलेली नाही.
अक्षय कुमारचा या वर्षात तिसरा लॉंच होणारा ‘रक्षाबंधन’ चित्रपटालाही नुकसान सहन करावे लागत आहे आणि अशा परिस्थितीत त्याची बॉक्स ऑफिस कमाईही काही विशेष नाही आहे. सुरुवातीच्या आकडेवारीनुसार, सहा दिवसांनंतर चित्रपटाचे एकूण कलेक्शन ३६.५७ कोटी रुपये झाले आहे.
साऊथच्या छोट्या बजेटच्या चित्रपटांसमोर आमिर आणि अक्षयचे चित्रपट कमाईच्याबाबतीत नाकाम!!
कार्तिकेय २
- चंदू मोंडेटी दिग्दर्शित ‘कार्तिकेय २’ रिलीज झाल्यापासून आमिर खानच्या ‘लाल सिंग चड्ढा’ला टक्कर देत आहे.
- सुपरस्टार निखिल सिद्धार्थचा ‘कार्तिकेय २’ हा चित्रपट तेलुगुसोबतच हिंदी भाषेतही प्रदर्शित झाला असून, त्याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.
- या चित्रपटाने ३.५० कोटींचा व्यवसाय केला आहे, जो आमिरच्या चित्रपटापेक्षा जास्त आहे.
- ३० कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने चौथ्या दिवशी २१.६२ कोटींची कमाई केली आहे.
विरुमन
- एम. मुथय्या दिग्दर्शित आणि लिखित, ‘विरुमन’ रिलीज झाल्यापासून अक्षय कुमारच्या ‘रक्षा बंधन’ला टक्कर देत आहे.
- या दोन्ही चित्रपटांमध्ये दररोज बॉक्स ऑफिसवर टक्कर होत असते.
- ‘विरुमन’ने पाचव्या दिवशी २ कोटींचा व्यवसाय केला आहे. त्याचवेळी, आता चित्रपटाची एकूण कमाई ३६.५७ कोटींवर गेली आहे.
नन ठान केस कोदू
- रतिन बाला कृष्णन दिग्दर्शित नन ठान केस कोदू
- या चित्रपटाच्या कमाईतही घट झाली आहे.
- कुंचको बोबन स्टारर ‘नन ठान केस कोदू’ने एकूण कमाई ८.५२ कोटींवर गेली आहे.
सीता रामम
- दुलकर सलमान आणि मृणाल ठाकूर यांच्या पॅन इंडिया चित्रपटाने आमिरच्या ‘लाल सिंग चड्ढा’लाही मागे टाकले आहे.
- या चित्रपटाच्या प्रदर्शनाचा दुसरा आठवडा सुरू आहे, मात्र तरीही तो यशस्वी ठरत आहे.
- ३० कोटींच्या बजेटमध्ये बनलेला हा चित्रपट फार पूर्वीपासूनच आपला खर्च वसूल करण्यात यशस्वी ठरला आहे.
- त्याचवेळी, चित्रपटाचे एकूण कलेक्शन ३६.५६ कोटी रुपये झाले आहे.