Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

शिवसागर जलाशयातील बंद असलेला बोटिंग व्यवसाय पुन्हा सुरु होणार

गृह राज्यमंत्री शंभूराज देसाईंचे निर्देश

March 31, 2021
in सरकारी बातम्या
0
shambhuraj desai

मुक्तपीठ टीम

शिवसागर जलाशयातील बंद असलेला बोटिंग व्यवसाय सुरू करणाऱ्या साठी गृह, वन आणि जलसंपदा विभागांनी प्रस्ताव तात्काळ सादर करण्याचे निर्देश गृह राज्यमंत्री (ग्रामीण) शंभूराज देसाई यांनी दिले.

शिवसागर जलाशयातील बंद असलेला बोटिंग व्यवसाय सुरू करण्याबाबत आढावा बैठक मंत्रालयात झाली त्यावेळी देसाई बोलत होते.

गृह राज्यमंत्री (ग्रामीण) देसाई म्हणाले, कोयना जलाशय परिसर हा १९७२ च्या अधिसूचनेद्वारे प्रतिसिद्ध क्षेत्र म्हणून प्रतिबंधीत असल्याचे जाहीर करण्यात आले होते. याबाबत हे क्षेत्र प्रतिसिद्ध क्षेत्रातून वगळण्याबाबतचा प्रस्ताव जलसंपदा विभागाने गृह विभागाकडे मंत्रालय स्तरावर तात्काळ सादर करावा. याबाबत दोन्ही विभागांनी सहमती दर्शविली आहे. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील मंजूर व्याघ्र संवर्धन आराखड्यातील निसर्ग पर्यटन आराखड्यानुसार कोयना जलाशयातील मार्ग जलवाहतूकीस मंजूर करण्यात आले असलेचे व्याघ्र प्रकल्पाचे अधिकारी यांनी स्पष्ट केले. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पचा जलवाहतूकीस अटी व शर्तीच्या अधिन राहून परवानगी देण्यास काही अडचण नसल्याचे देसाई यांनी स्पष्ट केले. वन्यजीव विभाग व जलसंपदा विभाग यांनी स्थानिक नागरिकांना यामध्ये कोणत्याही प्रकारची अडचण भासणार नाही याची दक्षता घ्यावी, असे निर्देशही देसाई यांनी दिले.

धरणाच्या सुरक्षिततेला कोणत्याही प्रकारची बाधा निर्माण होणार नाही याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दक्षता घ्यावी. आवश्यक मनुष्यबळासाठी महाराष्ट्र राज्य सुरक्षा मंडळ यांचेकडे गरज असेल तर मागणी करावी. असे निर्देश गृह विभागास देण्यात आले आहेत. वन्यजीव, जलसंपदा, गृह विभागाने याबाबत तात्काळ कार्यवाही करणेबाबतच्या सूचना संबंधितांना देसाई यांनी यावेळी दिल्या. सन २००३ च्या जलसंपदा विभागाच्या शासन निर्णयात आवश्यक ते बदल प्रस्तावित असल्याची माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी यावेळी दिली.

यावेळी अतिरिक्त पोलीस महासंचालक (कायदा व सुव्यवस्था) सुहास वारके, गृह विभागाचे प्रधान सचिव विनीत अग्रवाल, राज्य गुप्तवार्ता विभागाचे अधिकारी, जलसंपदा विभागाचे अधिकारी, जिल्हाधिकारी सातारा शेखर सिंह, जिल्हा पोलीस अधीक्षक, सातारा अजय बन्सल, उपसंचालक, वन्य जीव (सह्याद्री व्याघ्र प्रकल्प) उपस्थित होते.


Tags: गृह राज्यमंत्री शंभूराज देसाईबोटिंग व्यवसायशिवसागर जलाशय
Previous Post

चिपी विमानतळ लवकरात लवकर कार्यान्वित करण्याचे मुख्यमंत्री ठाकरेंचे निर्देश

Next Post

पुन्हा वाढ! आज ३९ हजार ५४४ रुग्ण, पुणे-मुंबई-नाशिक गंभीरच! ४८ तासात १२९ मृत्यू

Next Post
MCR 31-3-21

पुन्हा वाढ! आज ३९ हजार ५४४ रुग्ण, पुणे-मुंबई-नाशिक गंभीरच! ४८ तासात १२९ मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!