मुक्तपीठ टीम
स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांनी अंदमानातील पोर्टब्लेअर येथे काळ्यापाण्याची शिक्षा भोगली. त्यांना डांबलेली ती कोठडी लाखो भारतीयांचे श्रद्धास्थान आहे. या कोठडीत ‘पर्यटकांनी चप्पल किंवा बूट घालून जाऊ नये’ अशा आशयाचा फलक रावेरकरांनी येथून नेऊन तिथे लावला. हे नेमकं कसं घडलं ते सध्या सर्वत्र व्हायरल होत आहे.
कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यावर रावेर येथील शिक्षक व पत्रकार दिलीप वैद्य, प्रकाश पाटील, महसूल विभागाचे मंडळाधिकारी विठोबा पाटील आणि सरदार जी जी हायस्कूलचे उपमुख्याध्यापक टी बी महाजन सर तसेच माया वैद्य, पुष्पलता पाटील, सुजाता पाटील आणि मीना महाजन यांनी अंदमान येथे जाण्याचे ठरवले. ही बाब डॉ एस डी चौधरींना कळल्यावर त्यांनी दिलीप वैद्य यांना अंदमानच्या कोठडीत बूट आणि चप्पल घालून न जाण्याचा विनंती फलक तिथे लावण्याची कल्पना बोलून दाखवली. त्यांना ही कल्पना अतिशय आवडली. सर्वांनी मिळून रावेर येथूनच तशा आशयाचे फलक संजय जंजाळकर यांच्याकडून तयार करून घेतले आणि २४ नोव्हेंबरला अंदमान येथील त्या कोठडीत फलक लावण्यात आले.
त्यांच्या या आगळ्यावेगळ्या देशभक्तीचे तिथे भेट देणाऱ्या शेकडो पर्यटकांनी बाहेर चपला, बूट काढून ठेवत स्वागत केले.
आपण आपल्याला पवित्र वाटणाऱ्या श्रद्धास्थानाचे पावित्र्य जपण्यासाठी तिथे बूट किंवा चप्पल घालून जात नाही तर ते बाहेरच काढून ठेवतो. अंदमानातील पोर्ट ब्लेअर येथे काळ्यापाण्याची शिक्षा स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी ज्या छोट्याशा कोठडीत भोगली ती कोठडी देखील लाखो भारतीयांचे श्रद्धास्थान व तीर्थक्षेत्र आहे. स्वातंत्र्यवीरांनी स्वातंत्र्य चळवळीत भाग घेतांनाच भाषाशुद्धी, जातीभेद निर्मूलन या क्षेत्रात देखील मोठे योगदान दिले आहे. अंदमान आणि निकोबार या नैसर्गिक पर्यटनस्थळाला भेट देणारे पर्यटक या कोठडीला देखील हमखास भेट देतातच. तिथे स्वातंत्र्यवीर सावरकरांची देशभक्तीपर गीते म्हणतात आणि प्रार्थना ही करतात. मात्र काही पर्यटक या कोठडीत आपापले चप्पल आणि बूट घालून जात असल्याची आणि त्यांना तसे करण्यापासून कोणीही अडवत नसल्याची बाब रावेर तालुक्यातील निंभोरा येथील सामाजिक कार्यकर्ते डॉ एस डी चौधरी यांच्या लक्षात आली. त्यांनी ३ वर्षांपूर्वी अंदमान येथे सपत्नीक भेट दिली होती. मात्र पर्यटकांनी पादत्राणे बाहेर काढण्यासाठी आवश्यक असलेला फलक लावण्याची व्यवस्था त्यावेळी त्यांना तिथल्या तिथे करता येणे शक्य झाले नाही.
आता कोरोनाचा प्रभाव कमी झाल्यावर रावेर येथील शिक्षक व पत्रकार दिलीप वैद्य, प्रकाश पाटील, महसूल विभागाचे मंडळाधिकारी विठोबा पाटील आणि सरदार जी जी हायस्कूलचे उपमुख्याध्यापक टी बी महाजन सर तसेच माया वैद्य, पुष्पलता पाटील, सुजाता पाटील आणि मीना महाजन यांनी अंदमान येथे जाण्याचे ठरवले. ही बाब डॉ एस डी चौधरींना कळल्यावर त्यांनी श्री वैद्य यांना अंदमानच्या कोठडीत बूट आणि चप्पल घालून न जाण्याचा विनंती फलक तिथे लावण्याची कल्पना बोलून दाखवली. त्यांना ही कल्पना अतिशय आवडली. सर्वांनी मिळून रावेर येथूनच तशा आशयाचे फलक संजय जंजाळकर यांच्याकडून तयार करून घेतले आणि २४ नोव्हेंबरला अंदमान येथील त्या कोठडीत फलक लावण्यात आले. हे फलक वाचून तिथे भेट देणाऱ्या असंख्य पर्यटकांनी आनंद व्यक्त केला आहे आणि आपापले बूट- चप्पल बाहेर काढण्यास सुरुवात केली आहे. या कोठडीचे पावित्र्य यापुढे जपले जाईल अशी अपेक्षा आहे. याबद्दल भेट देणाऱ्या पर्यटकांनी आनंद व्यक्त केला आहे.
Highly appreciated



