मुक्तपीठ टीम
आलिशान लक्झरी गाडी म्हटली की आठवते बीएमडब्ल्यूच! लक्झरी व्हेईकल गाड्यांसाठी नावाजलेल्या या ग्लोबल ब्रँडने आता नवी 3 सीरीज ग्रॅन लिमोझिनची आयकॉनिक एडिशन भारतात लाँच केली आहे. बीएमडब्ल्यू 3 सीरीज ग्रॅन लिमोझिन आयकॉनिक एडिशन ही अत्याधुनिक तर आहेच पण तिचे उत्पादन भारतात झाले हे विशेष.
बीएमडब्ल्यूने चेन्नई येथील कारखान्यात या नव्या मॉडेलचे स्थानिक पातळीवर उत्पादन केले आहे. 3 सीरीज ग्रँड लिमोझिनची नवीन आवृत्ती ५३ लाख ५० हजार या सुरुवातीच्या किंमतीवर लाँच केली गेली आहे. बीएमडब्ल्यू दोन प्रकारांमध्ये आयकॉनिक एडिशन ऑफर करते, एक पेट्रोलमध्ये आणि दुसरी डिझेलमध्ये. डिझेल इंजिनसह आयकॉनिक एडिशनची किंमत ५४ लाख ९० हजार (एक्स-शोरूम) आहे.
कॉग्नाक आणि ब्लॅक या दोन रंगांच्या पर्यायांसह असणाऱ्या अपहोल्स्ट्रीला मागील सीटवर व्हेर्नस्का लेदर ट्रीटमेंट मिळते. आयकॉनिक एडिशनला अधिक इंटिरियर स्पेस आणि मागील बाजूस पुरेशी लेगरूम मिळते. आयकॉनिक एडिशनला पुन्हा डिझाइन केलेले हेडरेस्ट, मागील सीट दरम्यान सेंट्रल आर्मरेस्ट, क्रिस्टल गियर शिफ्ट नॉब, प्रकाशित 3 “मॉडेल लोगो आणि बरेच काही मिळते.
बीएमडब्ल्यू आयकॉनिक एडिशनचे फिचर्स
- बीएमडब्ल्यू आयकॉनिक एडिशन तीन बाह्य रंगांमध्ये आहे ज्यात मिनरल व्हाईट, कार्बन ब्लॅक आणि कश्मीरी सिल्व्हरचा समावेश आहे.
- लाँग-व्हीलबेस ग्रॅन लिमोझिन आयकॉनिक एडिशनला अतिरिक्त ११० मिमी व्हीलबेस मिळते
- आयकॉनिक एडिशनची लांबी ४,८१९ मिमी आहे आणि त्याची व्हीलबेस २,९६१ मिमी आहे. -बीएमडब्ल्यू 3 सीरीज ग्रॅन लिमोझिनची आयकॉनिक एडिशन एलईडी हेडलाइट्ससह सामान्य बीएमडब्ल्यू ग्रिलसारख्या अपेक्षित स्टाईलिंग घटकांसह येते.
- दोन मोठ्या फ्रीफॉर्म टेलपाइप्ससह स्लिम थ्री-डायमेंशनल एल-आकाराच्या एलईडी टेललाइट्समुळे मागील भाग देखील स्पोर्टिअर दिसत आहे.
- येथे ४८०-लिटर बूटची मोठी जागा देखील आहे ज्याला एक बटन दाबल्यावर ऑटोमेटिक टेल-गेटद्वारे उघडले जाऊ शकते.
पाहा व्हिडीओ: