मुक्तपीठ टीम
लक्झरी कार म्हटलं की आठवतो तो बीएमडब्ल्यू ब्रँड आणि बीएमडब्ल्यू म्हटले की ती कार प्रिमियम लक्झरीच असणार हे वेगळं सांगावंच लागत नाही. आता बीएमडब्ल्यू लवकरच ईलेक्ट्रिक स्कूटर लाँच करीत आहे. कंपनीने आपली पहिली ईलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च करण्याची घोषणा केली आहे. या स्कूटरचा व्हिडीओ टीझर जारी करण्यात आला आहे. यामध्ये या इ-स्कूटरचा भन्नाट लूक दिसून येत आहे.
या व्हिडीओ टिझरमार्फत कंपनीने स्कूटरबद्दलची माहिती दिली आहे. यामध्ये स्कूटरची झलक आणि इतर वैशिष्ट्ये दिसतात. कंपनीने या स्कूटरचे नाव बीएमडब्ल्यू सीई०४ ठेवले आहे. बीएमडब्ल्यूने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून प्रसिद्ध केलेल्या टिझरमध्ये ही स्कूटर रस्त्यावर धावत असल्याचे दाखविण्यात आले आहे.
या व्हिडीओ टीझरमधून सहजच लक्षात येते की बीएमडब्ल्यूची ई स्कुटर लक्झरी गाड्या तयार करते, त्याचप्रमाणे कंपनीने ही लक्झरी स्कूटरदेखील खास प्रिमियम बनविली गेली आहे. ही स्कूटर केवळ डिझाइनमध्येच नाही तर पॉवरमध्येदेखील बाजारातील सर्व इलेक्ट्रिक स्कूटरपेक्षा मजबूत आणि अधिक उर्जा देणारी असेल.
बीएमडब्ल्यू सीई०४ ईलेक्ट्रिक स्कूटर असणार तरी कशी?
• टीझरमध्ये दिसणार्या स्कूटरचा रंग आणि डिझाइन पाहून तो प्रीमियम असल्याचे जाणवते.
• या स्कूटरमध्ये कंपनी १० इंचाची टचस्क्रीन इन्स्ट्रुमेंट क्लस्टर सिस्टम देणार आहे.
• याबद्दलचे काही फीचर्स आणि इतर काही गोष्टींविषयी कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
• टीझर पाहून हे स्पष्ट होते की, कंपनीने नवीन डिझाइनचे एलईडी हेडलाइट दिले आहेत.
• या स्कूटरच्या लॉन्चिंगविषयीची माहिती कंपनीच्या अधिकृत सोशल मीडिया हँडल्सवर दिसून येईल.
• ज्यामध्ये त्याचे लॉन्चिंग फेसबुक आणि यूट्यूबवर प्रसारित केले जाईल.
• येथे केवळ कंपनीचे अधिकारीच या स्कूटरला जगासमोर आणणार नाहीत तर, या लाईव्ह इव्हेंट दरम्यान या स्कूटरची वैशिष्ट्ये आणि किंमतीची माहिती देखील दिली जाईल.
• कंपनीचे नाव आणि या स्कूटरची वैशिष्ट्ये पाहता असे मानले जात आहे की, या स्कूटरची किंमत २.२५ लाख रुपये असू शकते.