Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

मनपा उभारणार क्यू कोडसह फलक…संपूर्ण लसीकरण झालेली सुरक्षित जागा!

आदित्य ठाकरेंची मुंबई मनपाला वेगळी सूचना

September 6, 2026
in चांगल्या बातम्या
0
vaccination

मुक्तपीठ टीम

शिवसेनेचे युवा नेते आणि राज्याचे पर्यटन, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी मुंबई मनपाला एक वेगळी सूचना केली आहे. कोरोनाविरोधातील लढ्यात त्यामुळे पुढचं पाऊल उचललं जाईल. संपूर्ण लसीकरण झालेल्या ठिकाणांना सुरक्षित क्षेत्र असल्याचे जाहीर करण्यात येईल. त्यामुळे तिथे जाणे धोकादायक नसल्याचे इतरांच्या लक्षात येऊ शकेल. आदित्य ठाकरेंच्या या सुचनेनुसार, ज्या इमारती, कार्यालये, गृहनिर्माण सोसायट्यांमधील नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले असेल, त्या इमारतींच्या प्रवेशद्वाराजवळ क्यूआर कोडसह विशेष लोगो लावण्यात येईल.

 

आपत्तीवर मात करण्यासाठी राज्यातील सर्व नागरिकांचे कोरोना प्रतिबंधक लसीकरण लवकरात लवकर पूर्ण होण्याबाबत शासन प्रयत्नशील आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई उपनगर जिल्ह्यातील लसीकरणाचा पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी आढावा घेतला. याबरोबरच कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या प्रतिबंधासाठी आवश्यक सुविधांचाही त्यांनी आढावा घेतला.

 

पर्यटन मंत्री तथा पालकमंत्री ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या बैठकीस जिल्हाधिकारी निधी चौधरी, महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी, संबंधित उपायुक्त आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

 

ठाकरे यांनी कोरोनाची संभाव्य तिसरी लाट आली तर त्याविरूद्ध लढण्यासाठी उपलब्ध असणारे बेड्स, ऑक्सिजन व इतर सुविधा यासंबंधी मुंबई महानगरपालिकेच्या उपाययोजनेचा आढावा घेतला. महिलांच्या लसीकरणाबाबतही त्यांनी माहिती घेतली. त्याचबरोबर व्हेक्टर बॉर्न डिसीजवर नियंत्रण मिळविण्याबाबत स्थानिक प्रशासन करीत असलेल्या उपाययोजनांबाबत यावेळी चर्चा करण्यात आली.

 

महिला लसीकरणाबद्दल अभिनंदन आणि नवी सूचना

  • मागील आठवड्यात फक्त महिलांसाठी लसीकरण मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते.
  • या माध्यमातून एका दिवसात मुंबईत १.२७ लाख महिलांचे लसीकरण करण्यात यश आले.
  • याबद्दल संबंधित यंत्रणांचे अभिनंदन करून ठाकरे म्हणाले, यापुढे लसीकरणाचा दुसरा डोस देण्याबाबतही योग्य नियोजन करावे.
  • यामध्ये महिलांबरोबरच विद्यापीठांचे विद्यार्थी, कामावर जाणारे नागरिक यांचा प्राधान्याने समावेश करण्यात यावा.
  • दुसरा डोस झाल्यानंतर ज्या इमारती, कार्यालये, गृहनिर्माण सोसायट्यांमधील नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले असेल, त्या इमारतींच्या प्रवेशद्वाराजवळ क्यूआर कोडसह विशेष लोगो लावण्यात यावा, अशी सूचनाही त्यांनी मुंबई महानगरपालिकेला केली.
  • त्याचबरोबर कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांमध्ये नागरिकांचा सहभाग वाढावा यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहनही त्यांनी केले.

यावेळी संबंधित अधिकाऱ्यांनी कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांबाबत माहिती दिली.

 

पाहा व्हिडीओ:

 


Tags: BMCShivsenasuresh kakanivaccinationनिधी चौधरीमुंबई महानगरपालिकासुरेश काकाणी
Previous Post

चला दर्शनाला चला…चारधाम यात्रेसाठी विशेष ट्रेन सेवा पुन्हा सुरू!

Next Post

जुन्या स्मार्टफोननाही गुगलचा दिलासा! मालवेअर, फोन हॅकिंगपासून सुरक्षा!

Next Post
google

जुन्या स्मार्टफोननाही गुगलचा दिलासा! मालवेअर, फोन हॅकिंगपासून सुरक्षा!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!