Tuesday, May 13, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result
Home featured

मुंबई मनपाच्या शाळा देशातील टॉप टेनमध्ये! आदित्य ठाकरेंकडून कौतुक!!

November 20, 2021
in featured, घडलं-बिघडलं
0
bmc schools in top 10 schools in india

मुक्तपीठ टीम

मुंबई मनपाच्या मुंबई पब्लिक स्कूल, वरळी सी फेस शाळा आणि पूनमनगर सीबीएसई शाळा या दोन शाळांना देशातील अव्वल दहा सहकारी शाळांच्या यादीत स्थान मिळाले आहे. शिक्षण क्षेत्राशी निगडित संकेतस्थळाने देशभरातील सरकारी शाळांचे ऑनलाईन सर्वेक्ष करून ही यादी जाहीर केली आहे. या यशाबद्दल मुंबई उपनगर जिल्हा पालकमंत्री आदित्य ठाकरे, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर, मनपा आयुक्त इकबाल सिंह चहल, आदी मान्यवरांनी या शाळांचे भरभरून कौतुक केले आहे.

 

We’ve got 2 schools of the @mybmc in the @EWPortal ’s top ten in India!
Proud that the Mumbai Public School, Worli is ranked 1 in Maharashtra, 5th in India and and MPS Poonam Nagar CBSE is ranked 2 in Maharashtra and 10th in India.
Well done @mybmcedu https://t.co/vX5QJRAZ3N

— Aaditya Thackeray (@AUThackeray) November 17, 2021

शाळांनी ऑनलाईन अर्ज सादर केले

  • मुंबई मनपाअंतर्गत मुंबई पब्लिक स्कूल वरळी सी फेस शाळा व मुंबई पब्लिक स्कूल पूनमनगर सीबीएसई अभ्यासक्रम शाळा अशा दोन शाळा ‘एज्युकेशन वर्ल्ड स्कूल रँकिंग ऑफ गव्हर्नमेंट स्कूल्स इन इंडिया – सन २०२१-२२ या उपक्रम अंतर्गत ऑगस्ट २०२१ मध्ये आयोजित सर्वेक्षणामध्ये सहभागी झाल्या होत्या.
  • त्यासाठी या शाळांनी ऑनलाईन अर्ज सादर केले.
  • शिक्षकांचा अध्यापन दर्जा व क्षमता, शाळा इमारत, भौतिक सुविधा, अध्यापन कृती, विद्यार्थी सर्वांगीण विकासासाठी उपक्रम, सह-शालेय उपक्रम, ऑनलाईन पद्धतीने अध्यापन, मुख्याध्यापक नेतृत्व गुण, पालकांचा सहभाग या सर्व मुद्यांचा सर्वेक्षणामध्ये समावेश होता.
  • सर्वेक्षणामध्ये दिलेल्या माहितीच्या अनुषंगाने राज्यस्तरावर व राष्ट्रीय स्तरावर विविध शाळांची सखोल परिक्षण अंती निवड करण्यात आलेली आहे.
  • त्यामध्ये मुंबई पब्लिक स्कूल वरळी सी फेस मनपा शाळेस राज्यस्तरीय प्रथम क्रमांक व राष्ट्रीय स्तरावर पाचव्या क्रमांकाने मानांकन प्राप्त झाले आहे.
  • तसेच मुंबई पब्लिक स्कूल पूनमनगर सीबीएसई अभ्यासक्रम शाळेस राज्यस्तरीय द्वितीय क्रमांक व राष्ट्रीय स्तरावर दहावे मानांकन प्राप्त झाले आहे.

 

या दोन शाळांना जागतिक पातळीवर गौरविण्यात आले

  • हवामान कृती आराखड्यासाठी देखील सप्टेंबर २०२१ मध्ये या शाळांनी ऑनलाईन अर्ज सादर केले होते.
  • या अनुषंगाने या शाळांनी या उपक्रमावर काम करण्यास सुरुवात केली.
  • जागतिक व राष्ट्रीय स्तरावर हवामान बदलाबाबत सुरु असलेल्या प्रकल्पाची माहिती घेऊन विविध उपक्रम राबविण्यात आले.
  • तसेच या हवामान बदल उपक्रमामध्ये कार्यरत असलेल्या किंवा सहभागी असलेल्या परदेशांतील विविध शाळांशी संपर्क करून उपक्रम व प्रकल्पांबाबत माहितीची देवाणघेवाण करण्यात आली.
  • या सर्व उपक्रमांसाठी एकूण ३ आठवडे एवढा कालावधी होता.
  • या उपक्रमामध्ये जागतिक स्तरावर सहभागी शाळांपैकी सीबीएसई हरियाली व्हिलेज व सीबीएसई काणे नगर शाळांची निवड झाली असून त्यांचा जागतिक स्तरावर सन्मान करण्यात आला आहे.
  • मुंबई पब्लिक स्कूल अजीजबाग व मुंबई पब्लिक स्कूल पूनम नगर सीबीएसई अभ्यासक्रम शाळा अशा या दोन शाळांनाही यामध्ये सहभागी झाल्याबाबत गौरविण्यात आले आहे.

Tags: aditya thackerayBMCkishori pednekarMumbai Public SchoolPoonamnagar CBSE Schoolपालकमंत्री आदित्य ठाकरेपूनमनगर सीबीएसई शाळामहापौर किशोरी पेडणेकरमुंबई पब्लिक स्कूलमुंबई मनपा
Previous Post

उपोषण करणारे शेतकरी नेते रविकांत तुपकरांचे उपोषण स्थगित! प्रकृती खालावल्यानंतर सरकार धावले!

Next Post

शेतकरी शक्तीपुढे ३२ वर्षांपूर्वीही केंद्र सरकार झुकले होते…नेते होते टिकैतच!

Next Post
farmers won battle against central government under tikait leadership before 32 years

शेतकरी शक्तीपुढे ३२ वर्षांपूर्वीही केंद्र सरकार झुकले होते...नेते होते टिकैतच!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

featured

‘आपले सरकार’ पोर्टलची सेवा पाच दिवस बंद

by मुक्तपीठ टीम
April 8, 2025
0

जनसुरक्षा कायदा आहे तरी काय? जनसुरक्षा विधेयक मांडण्यात आलं. पुढील अधिवेशनात तो कायद्यात बदलला जाईल. त्यातील काही तरतुदी जनस्वातंत्र्यांसाठी धोका ठरू शकतात का?

जनसुरक्षा की जनस्वातंत्र्याला धोका? कोणताही दहशतवाद नकोच, पण सरकारचाही नकोच नको!

April 5, 2025
minister yogesh kadam said no force in pune st crime

कदमसाहेब, महाराज आठवा, रांझाच्या पाटलाच्या अवलादीला ठेचा, अप्रत्यक्ष साथ कुणाला?

February 28, 2025
Supreme court

सरकार विरूद्ध न्यायालय : वादात सापडलेली कॉलेजियम सिस्टम आहे तरी काय?

December 22, 2024
Alisha Gautam Orai

बाळाला ह्रदयाशी कवटाळून ‘आई’चा रॅम्पवॉक! कधी रंग, कधी उंची…वाचा या मॉडेलची संघर्ष कथा…

December 22, 2024
Kapil Sharma

स्कार्फ विक्रेता ते कोट्यधीश कॉमेडियन! अभिनेता कपिल शर्माचा संघर्षाचा प्रवास!

December 22, 2024
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!