Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

मुंबई फास्ट! ८५ दिवसांमध्ये १ किमी बोगदा खोदला! १५ किमीचे २ बोगदे सोडवणार पाणी समस्या!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
bmc

मुक्तपीठ टीम

किनारी रस्ता प्रकल्पाने भूमिगत बोगदा खणन करण्याची विक्रमी कामगिरी करणाऱ्या मुंबई मनपाच्या पाणीपुरवठा प्रकल्प खात्याने जल बोगद्यांच्या खणन कामातही नवी कामगिरी केली आहे. अमरमहाल ते परळ जलबोगदा कामात एका महिन्यात ५२६ मीटर खणन केले असून तर एकाच दिवसात ४० मीटरपेक्षा अधिक खणन करण्याची कामगिरी एकाच आठवड्यात दोन वेळा मनपाने केले आहे. या दोन्ही बोगद्यांचे काम पूर्ण झाल्यानंतर,१०० किलोमीटरपेक्षा अधिक अंतराचे भूमिगत पाणीपुरवठा बोगदे असणारे मुंबई हे जगातले दुसरे शहर असणार आहे. मुंबईच्या उत्तरेकडून दक्षिणेकडे जाणाऱ्या या जल बोगद्यांमुळे पाणी पुरवठा वाढून काही विभागातील पाणी टंचाई दूर होण्यास मदत होईल.

असे असणार भूमिगत जलबोगदे

  • मुंबई मनपाच्या पाणीपुरवठा प्रकल्प खात्याच्या वतीने पूर्व उपनगरांमध्ये पाणीपुरवठ्यात सुधारणा करण्यासाठी दोन भूमिगत जलबोगदे बांधण्यात येत आहेत.
  • अमरमहाल ते परळ हा सुमारे ९.६८ किलोमीटर लांबीचा भूमिगत जलबोगदा एफ/उत्तर आणि एफ/दक्षिण विभागांमध्ये तसेच ई आणि एल विभागातील काही परिसरात पाणीपुरवठा सुधारण्यास मदत करणार आहे.
  • तर अमरमहाल ते ट्रॉम्बे उच्च पातळी जलाशयापर्यंत जाणारा दुसरा बोगदा हा सुमारे ५.५२ किलोमीटर लांबीचा असून त्याद्वारे एम/पूर्व आणि एम/पश्चिम विभागातील पाणीपुरवठा सुधारण्यास मदत होणार आहे.
  • हे दोन्ही बोगदे जमिनीखाली सुमारे १०० ते ११० मीटर खोलीवर बांधण्यात येत असून त्यांचा व्यास ३.२ मीटर इतका आहे.
  • या दोन्ही बोगद्यांमधून येणाऱ्या भूमिगत जलवाहिन्या ह्या भूपृष्ठावरील मुख्य जलवाहिनी आणि सेवा जलाशय यांना जोडल्या जाणार आहेत.
  • पूर्व द्रुतगती मार्गावर स्थित दोन मुख्य जलवाहिन्यांमधून येणारे पाणी या बोगद्यांद्वारे पुढे जाणार आहे.

 

एकाच महिन्यात तब्बल ५२६ मीटर खणन

  • या भूमिगत जलबोगद्यांसाठी ‘टेराटेक’ कंपनीचे बोगदा खणन संयंत्र कार्यान्वित आहे.
  • या संयंत्राने नुकतीच विक्रमी कामगिरी साध्य केली आहे.
  • अमरमहाल ते परळ या पहिल्या भूमिगत जलद बोगद्याच्या कामामध्ये डिसेंबर २०२१ या एकाच महिन्यात तब्बल ५२६ मीटर खणन पूर्ण करण्यात आले आहे.
  • बोगद्याच्या कामाला सुरुवात केल्यानंतर अवघ्या ८५ दिवसांच्या कालावधीत सुमारे एक किलोमीटरचे खणन पूर्ण करण्याची कामगिरी यामुळे साध्य झाली आहे.
  • ही कामगिरी अपूर्व स्वरूपाची मानली जात असून त्यामुळे अभियांत्रिकी क्षेत्रातील तज्ञांकडून मनपाचे कौतुक केले जात आहे.
  • एवढेच नव्हे तर अमरमहाल ते ट्रॉम्बे या दुसऱ्या बोगद्याच्या खणन कामामध्ये एकाच दिवशी ४०.३ मीटर खणन करण्याची कामगिरी एकाच आठवड्यात दोन वेळा साध्य करण्यात आली आहे.
  • ही देखील अपूर्व कामगिरी मानली जात आहे.
  • या दुसऱ्या बोगद्याचे एकूण २.७५ किलोमीटरचे काम पूर्ण झाले आहे.
  • म्हणजेच त्याचे ५० टक्के काम पूर्ण झाले आहे.

Tags: aquifer mining workBMCकिनारी रस्ता प्रकल्पजलबोगदा खणनमुंबई मनपा
Previous Post

आर्मी पब्लिक स्कूलमध्ये ८ हजार ७०० जागांसाठी भरती

Next Post

“काट लो जुबान आंसुओं से गाऊंगा…” म्हणणाऱ्या अभिनेते किरण मानेंची मालिकेतील भूमिका कापल्यानं सोशल संताप!

Next Post
kiran mane

"काट लो जुबान आंसुओं से गाऊंगा..." म्हणणाऱ्या अभिनेते किरण मानेंची मालिकेतील भूमिका कापल्यानं सोशल संताप!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!