Saturday, May 17, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result
Home featured

ओबीसी आरक्षणाच्या सोडतीनंतर यशवंत जाधवांसह अनेक नगरसेवक वॉर्डवंचित!

July 29, 2022
in featured, घडलं-बिघडलं
0
rakhi Jadhav Yashwant jadhav Mahadeshwar

मुक्तपीठ टीम

येत्या दिवाळीपर्यंत मुंबई महापालिकेची निवडणूक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याच पार्श्वभूमीवर आज ओबीसी आरक्षणाची सोडत काढण्यात आली. या आरक्षण सोडतीचा फटका माजी स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव, राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी गटनेत्या राखी जाधव, माजी सभागृह नेत्या तृष्णा विश्वासराव, भाजपाचे माजी गटनेते प्रभाकर शिंदे, काँग्रेसचे माजी नगरसेवक आसिफ झकेरिया यांना बसला आहे. त्यामुळे या मातब्बर नगरसेवकांना आता दुसऱ्या वॉर्डात जाऊन लढावं लागणार आहे.

ओबीसी आणि महिला सर्वसाधारण वर्गांसाठी नव्याने आरक्षण काढले!!

  • मुंबई महापालिका निवडणुकीसाठी आरक्षण सोडत जाहीर करण्यात येत आहे.
  • स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत नागरिकांचा ओबीसी आरक्षण सोडत काढण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर आज ही प्रक्रिया पार पडत आहे.
  • कोर्टाच्या आदेशानंतर आता एससी आणि एसटी प्रवर्गाचे आरक्षण वगळता, यापूर्वी जाहीर करण्यात आलेले सर्वसाधारण महिला आणि सर्वसाधारण प्रवर्गाचे आरक्षण रद्द करुन, नव्याने ओबीसी आणि महिला सर्वसाधारण वर्गांसाठी आरक्षण काढण्यात आले.

२१९ पैकी ६३ प्रभाग हे ओबीसी आरक्षित!!

  • आज एससी, एसटी प्रवर्गाचे यापूर्वी घोषित झालेले आरक्षण वगळता २३६ पैकी २१९ प्रभागांची आरक्षण लॉटरी काढण्यात आली.
    २१९ पैकी ६३ प्रभाग हे ओबीसी आरक्षित झाले आहेत.
  • ६३ पैकी ५३ प्रभागात गेल्या तीन निवडणुकांमधे एकदाही ओबीसी आरक्षण आलेले नसल्याने नियमानुसार ५३ वॉर्ड ओबीसी आरक्षितच होतील.
  • तर सर्वसाधारण १५७ प्रभागांपैकी ७७ प्रभाग महिला आरक्षित होतील

ओबीसीसाठी राखीव वार्ड:

३, ७, ९, १२, १३, २७, ३०, ३८, ४०, ४२, ४८, ५१, ५३, ६२, ७६, ७९, ८१, ८७, ८९, १०१, ११०, ११७, १२८, १२९, १३२, १३५, १३७, १४६, १४७, १४८, १५०, १५२, १५४, १५५, १५९, १६१, १६४, १७४, १७९, १८०, १८३, १८५, १८८, १९५, २००, २०२, २०३, २१७, २१८, २२२, २२३, २३०, २३६

कोणते वॉर्ड OBC आरक्षित?

  • राष्ट्रवादीच्या गटनेत्या राखी जाधव यांचा वॉर्ड क्र १३० ओबीसी आरक्षित.
  • आधी हा वॉर्ड ओपन होता.
  • राखी जाधवांना बाजूचे वॉर्ड धुंडाळावे लागणार
  • मुंबई महापालिका निवडणुकीकरता आरक्षण सोडतीत शिवसेनेच्या माजी सभागृह नेत्या तृष्णा विश्वासराव यांना फटका, तृष्णा विश्वासराव यांचा वॉर्ड १८५ ओबीसी महिला आरक्षित, हा वॉर्ड आधी ओपन होता, तृष्णा विश्वासराव यांना बाजूचे वॉर्ड शोधावे लागणार
  • शिवसेनेचे माजी स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनाही आरक्षण सोडतीत धक्का, यशवंत जाधव यांचा वॉर्ड २१७ ओबीसी महिला आरक्षित
  • शिवसेनेचे माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांचा वॉर्ड क्र. ९६ ओबीसी महिला आरक्षित, परंतु विश्वनाथ महाडेश्वर यांच्या पत्नी, माजी नगरसेविका पूजा महाडेश्वर यांना या वॉर्डमधून उमेदवारी मिळू शकेल

कोणते वॉर्ड महिला आरक्षित?

  • भाजपचे गटनेते प्रभाकर शिंदे प्रभाग १०९ सर्वसाधारण महिला आरक्षित, प्रभाकर शिंदेना बाजूच्या वॉर्डमधून निवडणूक लढवावी लागणार
  • काँग्रेसचे नगरसेवक आसिफ झकेरिया यांनाही वॉर्ड आरक्षण सोडतीचा फटका, आसिफ झकेरियांचा वॉर्ड क्र १०४ सर्वसाधारण महिला आरक्षित झाला आहे
  • काँग्रेसचे माजी विरोधी पक्षनेते रवी राजा यांना आरक्षण सोडतीमध्ये फटका, रवी राजा यांचा १८२ वॉर्ड सर्वसाधारण महिला आरक्षित झाला

Tags: MaharashtraOBC reservationYashwant Jadhavओबीसी आरक्षणाच्या सोडतमहाराष्ट्रयशवंत जाधव
Previous Post

अविनाश भोसलेंची लंडनमध्ये हजार कोटींची मालमत्ता! खरेदीसाठी घोटाळ्याचा पैसा वापरल्याचा आरोप!!

Next Post

अखेर ठरलं! शिंदे गटाला ३५ टक्के, तर भाजपाला ६५ टक्के असं खातेवाटप!

Next Post
maharashtra shinde fadnavis ministry share

अखेर ठरलं! शिंदे गटाला ३५ टक्के, तर भाजपाला ६५ टक्के असं खातेवाटप!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

featured

‘आपले सरकार’ पोर्टलची सेवा पाच दिवस बंद

by मुक्तपीठ टीम
April 8, 2025
0

जनसुरक्षा कायदा आहे तरी काय? जनसुरक्षा विधेयक मांडण्यात आलं. पुढील अधिवेशनात तो कायद्यात बदलला जाईल. त्यातील काही तरतुदी जनस्वातंत्र्यांसाठी धोका ठरू शकतात का?

जनसुरक्षा की जनस्वातंत्र्याला धोका? कोणताही दहशतवाद नकोच, पण सरकारचाही नकोच नको!

April 5, 2025
minister yogesh kadam said no force in pune st crime

कदमसाहेब, महाराज आठवा, रांझाच्या पाटलाच्या अवलादीला ठेचा, अप्रत्यक्ष साथ कुणाला?

February 28, 2025
Supreme court

सरकार विरूद्ध न्यायालय : वादात सापडलेली कॉलेजियम सिस्टम आहे तरी काय?

December 22, 2024
Alisha Gautam Orai

बाळाला ह्रदयाशी कवटाळून ‘आई’चा रॅम्पवॉक! कधी रंग, कधी उंची…वाचा या मॉडेलची संघर्ष कथा…

December 22, 2024
Kapil Sharma

स्कार्फ विक्रेता ते कोट्यधीश कॉमेडियन! अभिनेता कपिल शर्माचा संघर्षाचा प्रवास!

December 22, 2024
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!