मुक्तपीठ टीम
लॉकडाऊनमुळे अनेक संकटाना सामोरे जात पालिकेने मालमत्ता कर थकबाकीचे ९८ टक्के पूर्ण केले असून वर्षभरात तब्बल ५ हजार १३५ कोटी ४३ लाखांची वसुली केली आहे. यामध्ये अंधेरी पूर्व-पश्चिम आणि वांद्रे-सांताक्रुझ पूर्वमध्ये सर्वाधिक कारवाई करण्यात आली आहे. पालिकेच्या इतिहासातील ही आतापर्यंतची सर्वाधिक वसुली आहे.
आर्थिक वर्ष २०२०-२१मध्ये रुपये ५ हजार २०० कोटी मालमत्ता कर जमा करण्याचे पालिकेचे लक्ष्य होते. लॉकडाउनमुळे कर वसुलीत अनेक अडथळे आले. मात्र या संकटावर पालिकेने मात केली आहे. पालिकेचे मालमत्ता कर ही महसुलाचे साधन आहे. अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या काही दिवसांपासून थकबाकिदारांविरोधात वेदंडात्मक कारवाईचा बडगा उगारण्यात आला.
कर थकवणाऱ्या थकबाकीदारांच्या मालमत्तेवर जलजोडणी, मलनि:सारण वाहिन्या खंडित करणे, चारचाकी वाहने, वातानुकूलित यंत्रणा यासारख्या महागड्या वस्तू जप्त करणे यासारखी कारवाई करण्यात आली. ३१ मार्च, २०२१ रोजी संपलेल्या आर्थिक वर्षात मालमत्ता करापोटी ५,१३५.४३ कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत, अशी माहिती सह आयुक्त सुनिल धामणे यांनी दिली.
या विभागातून सर्वाधिक कर वसुली
- के पूर्व अंधेरी पूर्व, जागेश्वरी-५४०.२८ कोटी
- के पश्चिम अंधेरी प. विलेपार्ले प.-४५४.५२
- एच पूर्व सांताक्रूझ, खार,वांद्रे पूर्व-४११.२५
- जी दक्षिण वरळी-३९९.२९
- एच भांडुप- ३०३.६८