Saturday, September 26, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

तन्मय फडणवीसला मुंबई मनपाने कोरोना लसीचा पहिला डोस कोणत्या निकषाखाली दिला?

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
bmc & tanmay fadanvis

मुक्तपीठ टीम

लसीकरणासाठी आवश्यक ४५ वयोगटात बसत नसतानाही पुतण्या तन्मयने कोरोना लसीचा दुसरा डोस घेतल्यामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नियमानुसार नसेल तर लस घेणे चुकीचेच असल्याचे म्हटले आहे. त्याचवेळी तन्मयला दुसरा डोस देणाऱ्या नागपुरातील नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटने स्पष्टीकरण दिले आहे की मुंबईतील सेव्हन हिल्स रुग्णालयात तन्मयने पहिला डोस घेतल्याचे प्रमाणपत्र असल्याने आम्हाला दुसरा डोस द्यावा लागला. त्यामुळे आता प्रश्न निर्माण झाला आहे की, मुंबई मनपाच्या अख्यतारीतील सेव्हन हिल्स रुग्णालयात फडणवीसांच्या पुतण्याला कोणत्या नियमाखाली कोरोना लसीचा डोस देण्यात आला?

पुतण्याने लस घेतल्याच्या वादावर देवेंद्र फडणवीसांचं स्पष्टीकरण:

  • कोरोना लसीकरणासाठी असणाऱ्या नियमांचं पालन केलं पाहिजे याबाबत दुमत नाही.
  • कोणालाही चुकीच्या पद्धतीने ते करण्याची परवानगी देता कामा नये.
  • तन्मय फडणवीस माझा दूरचा नातेवाईक आहे.
  • त्याला कोणत्या निकषानुसार लसीचा डोस मिळाला याची मला कल्पना नाही.
  • जर हे नियमानुसार झालं असेल तर त्याच्यावर आक्षेप घेण्याचं कारण नाही.
  • जर नियमावलीचं उल्लंघन झालं तर हे अगदी अयोग्य आहे.
  • पात्र नसल्याने माझ्या पत्नी आणि मुलीलाही लस मिळालेली नाही. प्रत्येकाने नियमांचं पालन केलं पाहिजे हे माझं ठाम मत आहे.

तन्मयने दुसरा डोस घेतलेल्या नागपुरातील रुग्णालयाचे स्पष्टीकरण

  • तन्मय फडणवीसने नागपूरमधील नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटमध्ये लसीचा दुसरा डोस घेतला.
  • तेथेच त्याने छायाचित्र काढून ते इंस्टाग्रामवर पोस्ट केले होते.
  • वाद झाल्यानंतर त्याने ते छायाचित्र असलेली पोस्ट डिलीट केली होती. या वादाबद्दल नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटचे संचालक शैलेश जोगळेकर यांनी स्पष्टीकरण दिले आहे.
  • तन्मय फडणवीसने आमच्याकडे कोरोना लसीचा दुसरा डोस घेतला. मुंबईमधील सेव्हन हिल्स रुग्णालयात त्याने पहिला डोस घेतला होता.
  • तन्मयला कोणत्या निकषाद्वारे पहिला डोस देण्यात आला याची कल्पना नाही.
  • त्याने आम्हाला प्रमाणपत्र दाखवल्यानंतर आम्ही आमच्या सेंटरमध्ये दुसरा डोस दिला.

तन्मय फडणवीसने पहिला डोस घेतलेले सेव्हन हिल्स कोणाचे?

  • तन्मय फडणवीसने पहिला डोस घेतलेले सेव्हन हिल्स रुग्णालय मुंबईतील अंधेरी पूर्व भागात आहे.
  • सरकारच्या भूखंडावर उभारलेले हे रुग्णालय खासगी संस्था चालवत होती.
  • मात्र, तोटा झाल्यानंतर ते बंद झाले. मुंबई मनपाने ते ताब्यात घेतले.
  • मुंबई मनपाने कोरोना संकट काळात कोरोना उपचार केंद्र म्हणून वापरत आहे.
  • कोरोनावरील चांगले उपचार आणि लसीकरणातील सेव्हन हिल्स रुग्णालयाची कामगिरीचे कौतुक होत असते.
  • मात्र, आता तन्मय फडणवीस या २३ वर्षाच्या तरुण कलाकाराला कोणत्या निकषाखाली कोरोना लसीचा पहिला डोस देण्यात आला, यामुळे हे रुग्णालयही वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची शक्यता आहे.

 


Tags: BMCdevendra fadanvistanmay fadnavisvaccinationतन्मय फडणवीसदेवेंद्र फडणवीसनॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटमुंबई महानगरपालिकासेव्हन हिल्स रुग्णालय
Previous Post

आयसीएसईचीही दहावीची परीक्षा रद्द, महाराष्ट्रात कधी रद्द होणार?

Next Post

#मुक्तपीठ मंगळवारचे व्हायरल बातमीपत्र

Next Post
muktpeeth Top 10

#मुक्तपीठ मंगळवारचे व्हायरल बातमीपत्र

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!