Sunday, March 8, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

“ठाण्यात नवरात्रीनिमित्त महारक्तदान सप्ताह”, एकनाथ शिंदे यांची संकल्पना

October 7, 2021
in घडलं-बिघडलं, चांगल्या बातम्या
0
eknath shinde

मुक्तपीठ टीम

शिवसेनेचे दिवंगत जिल्हाप्रमुख धर्मवीर आनंद दिघे यांनी सुरू केलेला टेंभी नाक्याचा नवरात्रौत्सव हे तमाम देवीभक्तांच्या श्रद्धेचे स्थान. पारंपरिक पद्धतीने साजरा होणाऱ्या या नवरात्रौत्सवाची देवीभक्त वर्षभर आतूरतेने वाट बघत असतात. शिवसेना नेते व ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी धर्मवीर आनंद दिघे यांचा हा वारसा पुढे सुरू ठेवत यंदा त्याला समाजकारणाची जोड दिली आहे. गेले दीड वर्षाहून अधिक काळ सुरू असलेला कोरोनाचा कहर आणि त्यामुळे राज्यभरात निर्माण झालेली रक्ताची टंचाई लक्षात घेऊन एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून नवरात्रीच्या काळात ८ ते १४ ऑक्टोबर या कालावधीत महारक्तदान सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.

 

सध्या राज्यभरातील ब्लड बँकांमध्ये रक्ताची टंचाई मोठ्या प्रमाणावर जाणवते आहे. त्यामुळे रुग्णांचीही परवड होत आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही अलिकडेच मोठ्या प्रमाणावर रक्तदान करण्याचे आवाहन केले होते. यालाच अनुसरून एकनाथ शिंदे यांनी यंदा नवरात्रीचे औचित्य साधून महारक्तदान सप्ताह आयोजित करण्याचा संकल्प सोडला. त्यानुसार शिवसेना ठाणे व पालघर जिल्हा शाखेच्या वतीने या महारक्तदान सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.

 

जांभळी नाका येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदानात ८ ते १४ ऑक्टोबर या कालावधीत सकाळी ८ ते संध्याकाळी ५ या वेळेत हा रक्तदान सप्ताह होणार आहे, असे शिवसेनेचे ठाणे जिल्हाप्रमुख व ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के यांनी सांगितले. शिवसेना आणि शिवसैनिक नेहमीच समाजकार्यात पुढे असतात. शिवसेनेची तर आरोग्यसेवेशी सुरुवातीपासून नाळ जुळलेली आहे. शाखाशाखांमध्ये रुग्णवाहिकांच्या माध्यमातून शिवसेना नेहमीच आरोग्यसेवेत पुढे असते. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या आवाहनाला प्रतिसाद देत पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून या रक्तदान सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे, असेही नरेश म्हस्के यांनी सांगितले. ठाणे जिल्हा सर्वसाधारण रुग्णालय आणि स्टेट ब्लड ट्रान्स्फ्युजन कौन्सिल यांच्या सहकार्याने या शिबिराचे आयोजन करण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली.

 


Tags: chief minister uddhav thackerayMinister Eknath ShindeNavratriShivsenaएकनाथ शिंदेनरेश म्हस्केनवरात्रीमुख्यमंत्री उद्धव ठाकरेरक्तदान सप्ताहशिवसेना
Previous Post

लखीमपूर शेतकरी हत्याकांडाविरोधात महाराष्ट्र बंदसाठी आघाडीची तयारी, भाजपाचा टोला!

Next Post

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारींच्या हस्ते १० व्या मेडस्केप इंडिया नॅशनल अवॉर्ड ट्रॉफीचे अनावरण

Next Post
koshyari

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारींच्या हस्ते १० व्या मेडस्केप इंडिया नॅशनल अवॉर्ड ट्रॉफीचे अनावरण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
featured

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
June 20, 2025
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

May 29, 2025
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!