Saturday, March 7, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

‘रक्तदान करा-जीव वाचवा’: मानवी जीवन वाचवण्यासाठी दक्षिण कमांडच्या सैनिकांकडून रक्तदान मोहीम

December 27, 2022
in featured, घडलं-बिघडलं, चांगल्या बातम्या
0
Southern Command Soldiers

मुक्तपीठ टीम

देशाच्या दक्षिण भागात लष्कर दिनाच्या अगोदर आयोजित करण्यात येत असलेल्या विविध कार्यक्रमांचा भाग म्हणून महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, केरळ, तेलंगण, तामिळनाडू, गुजरात, राजस्थान,मध्यप्रदेश आणि उत्तर प्रदेश या राज्यांच्या विविध भागांमध्ये तैनात सैन्याच्या  कार्यालये आणि युनिट्सकडून आज व्यापक रक्तदान मोहीम हाती घेण्यात आली. भारतीय लष्कराने ही मानवतावादी मोहीम प्रमुख सरकारी रूग्णालये आणि सामाजिक संस्थांच्या सहकार्याने हाती घेतली असून गरजू रूग्णांना योग्य वेळेवर दान केलेले रक्त पोहचावे, याची सुनिश्चिती करण्यासाठी ही मोहीम होती.

Southern Command Soldiers

‘रक्तदान करा-जीव वाचवा’ या संकल्पनेंतर्गत ही रक्तदान मोहीम आयोजित करण्यात आली  होती. दक्षिण कमांडने येत्या १५ जानेवारी २०२३ रोजी होत असलेल्या भारतीय लष्कराच्या ७५व्या स्थापना दिनानिमित्त ही रक्तदान  शिबिरे आयोजित केली. स्वयंस्फूर्तीने केलेल्या रक्तदानातून ७ हजार ५०० बाटल्या रक्त जमा करण्यात आले. तसेच आपत्कालीन परिस्थितीत वापरता  येण्यासाठी ७५ हजार स्वयंसेवकांनी केलेल्या रक्तदानाद्वारे रक्तसाठा संकलित करण्यात आला.  लष्करी कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांकडून, तसेच मुलकी संरक्षण कर्मचारी, राष्ट्रीय  छात्र सेनेचे कॅडेट्स, महाविद्यालयीन विद्यार्थी, सैनिकी शाळांचे शिक्षक आणि जीवनाच्या सर्व स्तरांतील स्वयंसेवकांचा अभूतपूर्व प्रतिसाद या मोहीमेस मिळाला. दक्षिण कमांडवर ज्या क्षेत्राची जबाबदारी आहे त्या दहा राज्यांतील सर्व प्रमुख शहरांमध्ये तसेच दुर्गम  भागातील प्रदेशांमध्येही ही शिबिरे आयोजित केली होती.

Southern Command Soldiers

पुणे येथे कमांड रूग्णालय, आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ कार्डिओ थोरॅसिक सायन्सेस(एआयसीटीएस-सैनिक हृदय वक्ष विज्ञान संस्थान), खडकी आणि खडकवासला येथील लष्करी  रूग्णालय या चार ठिकाणी रक्तदान मोहीम हाती घेण्यात आली. येथे जवळपास ७०० बाटल्या रक्त संकलित करण्यात आले. पुण्यातील रक्तदान मोहीमेचे उद्घाटन दक्षिण कमांड मुख्यालयाचे चीफ ऑफ स्टाफ लेफ्टनंट जनरल मंजीत  कुमार यांच्या हस्ते करण्यात आले.

दक्षिण कमांडने  ज्या ठिकाणी रक्तदान मोहीम हाती घेतली  त्यांची यादी खाली दिली आहे.

राज्य शहरे
महाराष्ट्र मुंबई, पुणे, खडकी, खडकवासला, देहू रोड, कामटी, पुलगाव, अहमदनगर, देवळाली आणि औरंगाबाद
गोवा पणजी
राजस्थान जोधपूर, नसिराबाद, जैसलमेर, लौंगेवाला, उदयपूर, निवारू, अलवार, माऊंट अबु, अजमेर आणि जलिपा
गुजरात गांधीनगर, अहमदाबाद, जामनगर, ध्रांगध्रा, आणि भुज
मध्यप्रदेश बबिना, सौगोर, धाना, ग्वाल्हेर, भोपाळ
तेलंगण सिकंदराबाद आणि हैदराबाद
तामिळनाडू कोईंमतूर, चेन्नई आणि वेलिंग्टन
केरळ थिरूवनंतपुरम, कन्नूर
कर्नाटक बंगळुरू आणि बेळगावी
उत्तरप्रदेश झाशी

‘रक्तदान करा-जीव वाचवा’ या संकल्पनेंतर्गत आयोजित या मोहीमेने सैनिक-नागरिक संबंध अधिक दृढ  होण्यासाठी मोठे  योगदान दिले असून संकटकाळात नागरिकांच्या खांद्याला खांदा लावून उभे राहण्याची  भारतीय लष्कराची वचनबद्धता पुन्हा एकदा व्यक्त केली आहे.  समाजाच्या सर्व स्तरातील लोकांना विशेषतः युवकांना समाजाप्रती कर्तव्य बजावण्यासाठी आणि मौल्यवान जीव वाचू शकतील, यादृष्टीने सहभाग घेण्यासाठी प्रेरित करण्यासाठी असे  उदात्त उपक्रम  दीर्घकाळ पुढेही सुरू राहील.

लष्करी कमांड आणि युनिट्सच्या वरिष्ठ लष्करी कमांडर्सनी नागरिकांचे त्यांच्या अनमोल  योगदानासाठी आणि ही मोहीम भव्य स्तरावर यशस्वी करण्यासाठी आभार मानले आहेत.


Tags: Blood Donation CampaignDonate Blood Save Livesgood newsHuman LifemuktpeethSouthern Command Soldiersघडलं-बिघडलंचांगली बातमीदक्षिण कमांड सैनिकमानवी जीवनमुक्तपीठरक्तदान करा-जीव वाचवारक्तदान मोहीम
Previous Post

ग्लेनमार्कची भारतात टाईप २ मधुमेह आणि अधिक इन्सुलिन प्रतिरोध असलेल्या प्रौढांसाठी गोळी

Next Post

तुमच्या आधार कार्डला दहा वर्ष झालीत? आपली कागदपत्रे अपडेट करा! कसं ते जाणून घ्या…

Next Post
Aadhaar card

तुमच्या आधार कार्डला दहा वर्ष झालीत? आपली कागदपत्रे अपडेट करा! कसं ते जाणून घ्या...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
featured

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
June 20, 2025
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

May 29, 2025
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!