मुक्तपीठ टीम
लगतच्या फेटरी येथे ग्रामपंचायत आणि बोधीसत्व बुद्धविहार यांच्या संयुक्त विद्यमाने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणदिनानिमित्त भव्य रक्तदान आणि भोजनदान करण्यात आले.
महामानव डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६४ व्या महापरिनिर्वाणदिनी यंदा पहिल्यांदाच भोजनदानासोबत रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले. भगवान गौतम बुद्ध आणि डाॅ. आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण व मोमबत्ती प्रज्वलित करुन कार्यक्रमाचा प्रारंभ झाला. नाशिकराव तिरपुडे रक्तपेढी, इंदोरा, नागपूर यांच्या सहकार्याने ५२ आंबेडकरी अनुयायांनी स्वयंस्फूर्तीने रक्तदान केले. तसेच डाॅ. आंबेडकर यांच्या दुर्मिळ वस्तुंचे संग्रहालय असलेल्या शांतीवन, चिचोली येथे आलेल्या असंख्य बौध्द बांधवांना भोजनदान करण्यात आले. सरपंच धनश्री ढोमणे, ग्रा. पं. सदस्य प्रेमकुमार ढोणे, महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष मुकेश ढोमणे, धीरज पाटील, राकेश पाटील, योगेश माझी, संदीप कुंटे, अमोल सांगोळे, प्रणित फुले, गौरव धनविजय, राजु गायकवाड, लोकेश काळबांडे, रामभाऊ वाघमारे, अमोल काळे, अभिजित गुडधे, रोहित पाटील, आयुष पाटील, समीर ठाकरे, आशिष जामगडे, अविनाश जामगडे, चैतन्य पाटील आदींनी कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी अथक परिश्रम घेतले.