मुक्तपीठ टीम
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव थांबण्यासाठी लस उपलब्ध झाली परंतु ती घेतल्यानंतर रक्तदान करताना कोणती काळजी घ्यावी, यासाठी नॅशनल ब्लड ट्रान्समिशन कान्सिलने (एनबीटीसी) अलीकडेच मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. कोरोना लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर ५६ दिवसांपर्यंत, आणि दुसऱ्या डोसपासून २८ दिवस डोस घेतलेली व्यक्ती रक्तदान करू शकत नाही.
एनबीटीसीच्या नियामक मंडळाच्या बैठकीत कोरोनाची लस मिळाल्यानंतर रक्तदान न करण्याची मुदत निश्चित करण्यात आली.
लसीचा दुसरा डोस मिळाल्यानंतर रक्तदात्यास २८ दिवस प्रतीक्षा करावी लागेल, म्हणजेच प्रथम डोस घेतल्यानंतर ५६ दिवस तो रक्तदान करू शकणार नाही.
या सूचना एनबीटीसीचे संचालक डॉ सुनील गुप्ता यांनी जारी केल्या आहेत. कोणत्याही व्यक्तीला २८ दिवसांंनंतरच लसीचा दुसरा डोस घेतला पाहिजे. लस घेतल्यानंतर अँटीबॉडी तयार होण्यासाठी दोन आठवडे लागतात. तसेच लसीकरणाच्या या संपूर्ण कालावधीत मद्यपान करु नये.