मुक्तपीठ टीम
पृथ्वीच्या सर्वात जवळ असलेले कृष्णविवर शोधण्यात शास्त्रज्ञांना यश आले आहे. कृष्णविवरला ब्लॅक होल म्हटले जाते. त्याचा आकार सूर्यापेक्षा १० पटीने मोठा असल्याचे म्हटले जात आहे. पूर्वी सापडलेल्या कृष्णविवरापेक्षा ते तिप्पट मोठे आहे. ते पृथ्वीपासून फक्त १६०० प्रकाशवर्षे अंतरावर आहे. अमेरिकन शास्त्रज्ञांनी सांगितले की, हे कृष्णविवर त्याच्या जोडीच्या ताऱ्यांच्या हालचालीचे निरीक्षण करून ओळखले गेले. महत्वाची गोष्ट म्हणजे, इतर कृष्णविवरांप्रमाणेच हे कृष्णविवर आपण दुर्बिणीनेदेखील पाहू शकत नसलो तरीही या कृष्णविवरा भोवती फिरणारे दोन तारे सध्या डोळ्यांनी पाहू शकतो.
पृथ्वी सूर्याभोवती प्रदक्षिणा घालते त्याच अंतरावर हा तारा कृष्णविवराभोवती फिरतो. हार्वर्ड-स्मिथसोनियन सेंटर फॉर अॅस्ट्रोफिजिक्सचे करीम अल-बद्री म्हणाले की सुरुवातीला युरोपियन एजन्सीच्या गैया स्पेसक्राफ्टच्या मदतीने त्याची ओळख पटली.
कृष्णविवरचा पृथ्वीला कोणताही धोका नाही!
- नासाच्या म्हणण्यानुसार, पृथ्वी कृष्णविवरात पडणार नाही, कारण कोणतेही कृष्णविवर सूर्यमालेच्या इतके जवळ नाही.
- कृष्णविवरमध्येही सूर्यासारखेच गुरुत्वाकर्षण असेल.
- पृथ्वी आणि इतर ग्रह कृष्णविवराभोवती फिरतील. तसेच, शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की सूर्य कधीही कृष्णविवरामध्ये बदलणार नाही.
शास्त्रज्ञांना कृष्णविवर असल्याची खात्री कशाप्रकारे पटली?
- दक्षिण अमेरिकेमधील चिली मधील ला सिला दुर्बिणीतून या दोन ताऱ्यांचा अभ्यास करत असताना संशोधकांच्या लक्षात आले की, या ठिकाणी दोन ताऱ्यांबरोबरच एक तिसरी गोष्ट लपलेली आहे.
- जिथे तारे घिरट्या मारत आहेत त्याच्यामध्ये कृष्णविवर आहे.
- जरी हे कृष्णविवर संशोधकांना दिसू शकलेले नाही तरीही या दोन ताऱ्यांच्या गतीचा आणि त्यांच्यावर होत असलेल्या गुरुत्वाचा काही महिने अभ्यास करून शास्त्रज्ञांना तिथे कृष्ण विवर असल्याची खात्री पटली.