मुक्तपीठ टीम
मुंबई-ठाण्याबाहेर शिवसेनेला सर्वप्रथम साथ दिली ती औरंगाबाद आणि मराठवाड्यानं. औरंगाबादला तर शिवसेनेचा बालेकिल्ला मानतात. मुंबईनंतर आता भाजपाने शिवसेनेच्या या दुसऱ्या बालेकिल्ल्याला लक्ष्य केले आहे. भाजपाच्या राज्य कार्यकारिणीची बैठक तिथं आयोजित करण्यात आली आहे. तसेच औरंगाबादच्या पाणीप्रश्नावरील स्थानिक मोर्चाचं नेतृत्व करण्यासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस करणार आहेत.
भाजपाच्या कार्यकारिणी बैठकीसाठी औरंगाबादची निवड!
- भाजपाच्या राज्य कार्यकारिणीची बैठक औरंगाबादेत होणार आहे.
- औरंगाबादेत भाजपा राज्य कार्यकारिणीची बैठक २००५-०६ मध्ये झाली होती.
- त्या वेळी ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवानी यांची मराठवाडा सांस्कृतिक मंडळावर सभा झाली होती.
- आगामी महापालिका, जिल्हा परिषद निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून भाजपाने २८ व २९ मे रोजी बैठकीचे आयोजन केले होते. बैठकीच्या समारोपासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांना निमंत्रित केले.
- या दरम्यान शाहा यांना येणे शक्य नसल्याने कार्यकारिणी बैठक पंधरा दिवस पुढे ढकलली जाण्याची शक्यता आहे.
२३ मे रोजी फडणवीसांच्या नेतृत्वाखाली औरंगाबादेत पाणी प्रश्नावर मोर्चा
- सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर राज्यात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.
- शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या औरंगाबाद आणि मराठवाड्यात भाजपाची ताकद दाखविण्यासाठी २३ मे रोजी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पाणीप्रश्नी मोर्चा काढण्यात येणार आहे.