मुक्तपीठ टीम
अंधेरी मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीतील भाजपाचे उमेदवार मुरजी पटेल यांनी अखेर माघार घेतली आहे. .भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी याबाबतची माहिती दिली. मुरजी पटेल हे अपक्ष म्हणून देखील निवडणूक लढवणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवार आणि दिवंगत आमदार रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांचा विजय निश्चित मानला जातोय. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेसाठी हा मोठा दिलासा आहे. त्यामुळे आता इतर अपक्ष आणि अन्य उमेदवारही माघार घेतात की लढतीनंतरच ऋतुजा रमेश लटकेंच्या विजयाचा सोपस्कार पूर्ण होतो, हे लवकरच कळेल.
अंधेरी पोटनिवडणुकीतून मुरजी पटेलांचा माघार!!
- रविवारी राज ठाकरे आणि शरद पवार यांनी अंधेरी पोटनिवडणुक बिनविरोध करण्याची विनंती केली होती. त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘सागर’ बंगल्यावर आशिष शेलार आणि मुरजी पटेल यांच्यात बैठक झाली. या बैठकीत आशिष शेलार आणि मुरजी पटेल हे निवडणूक लढवण्यासाठी ठाम होते.
- पण पोटनिवडणुकीतून उमेदवार माघार घेण्याबाबत दादर येथील मुंबई कार्यालयामध्ये भाजपचे राष्ट्रीय सचिव आणि महाराष्ट्राचे प्रभारी सी. टी. रवी यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली.
- या बैठकीत मुरजी पटेल यांना माघार घेण्याचा निर्णय घेण्यात आला.
- यामुळे मुरजी पटेल यांनी आपला अर्ज मागे घेतला आहे.
ऋतुजा लटकेंची पहिली प्रतिक्रिया-
- मी सर्वप्रथम सर्वांचे आभार मानते.
- सर्व पक्षातील जे वरिष्ठ नेते आहेत.
- त्यांच्याकडून जी पत्र गेली.
- त्यांनी जी माझे पती रमेश लटके यांच्या कामाबद्दल आणि त्यांचं प्रत्येकाशी असलेलं सहकार्याचं नातं.
- प्रत्येकजण म्हणत होतं की माझे सहकारी होते.
- माझ्या बरोबर होते. त्या कामाची पावती आणि त्यांच्याबरोबर असलेल्या संबंधामुळे आज मला हा सगळ्यांचा आशीर्वाद मिळालेला आहे.
- त्यामुळे प्रत्येकाचे मी आभार मानते.