Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

मुख्यमंत्री किंवा स्थानिक नेते नाही, तर मोदींच्या नावावरच भाजपा मागणार मतं!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
Prime Minister Narendra Modi

मुक्तपीठ टीम

भाजपाने आगमी निवडणुकांसाठी आखलेली रणनीती ही ब्रँड मोदीच्या बळावरच मतदारांना साकडं घालण्याची दिसत आहे. कारण यापुढील निवडणुकांमध्ये राज्यांमधील नेत्यांच्या, मुख्यमंत्र्यांच्या नावावर नाही तर फक्त आणि फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नावावरच मत मागण्यात येणार आहेत.

भाजपाचा का मोदींवरच भर?

  • भाजपा हा पक्ष सर्वेक्षण, डेटा विश्लेषणावर काम करत असतो.
  • त्यातून मिळणाऱ्या माहितीच्या आधारे राजकीय रणनीती ठरवली जाते.
  • काही दिवसांपूर्वी केलेल्या अशाच एका सर्वेक्षणात भाजपचे बहुतांश मुख्यमंत्री फारसे लोकप्रिय नसल्याचे दिसून आले आहे.
  • २०२४ पूर्वी होणाऱ्या निवडणुकांमध्ये राज्यांमधील सत्ता टिकवण्यासाठी पक्षाला पंतप्रधान मोदींची लोकप्रियता आणि केंद्राच्या कल्याणकारी योजनांवर अवलंबून राहावे लागेल, असा निष्कर्ष काढला गेला.
  • त्यामुळेच आता मते मागताना भाजपा मोदींचाच ब्रँड वापरणार आहे.

जिथं आहे संकट, तिथं मोदींसोबत स्थानिक मिनी ब्रँडही!

  • अर्थात सर्वच राज्यांमध्ये फक्त मोदी या एकाच मेगाब्रँडवर भर दिला जाणार नाही.
  • काही राज्यांमध्ये जिथं मोदी युगातही भाजपा लोकप्रियता मिळवू शकलेली नाही, किंवा सत्तेनंतर संकटात आली आहे, तिथं वेगळी रणनीती असेल.
  • अशा राज्यांमध्ये मोदींच्या मेगाब्रँडसोबतच स्थानिक जातीय, धार्मिक समीकरणं लक्षात घेत त्या वर्गात लोकप्रिय असणारे काही स्थानिक मिनी ब्रँडही वापरले जातील.
  • त्यामुळेच नियम मोडत कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांचा ७९ वर्षीय असूनही संसदीय मंडळात समावेश करण्यात आला आहे.
  • पुढच्या वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुका आणि २०२४च्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये कर्नाटकात जास्तीत जास्त जागा जिंकायच्या असतील तर या लिंगायत नेत्याचा पूर्ण पाठिंबा महत्त्वाचा आहे.
  • भाजपाने पंजाबमध्ये शीख नेते इक्बाल सिंग लालपुरा आणि मध्य प्रदेशात दलित चेहरा सत्यनारायण जातिया यांची निवड केली.

Tags: BJPmuktpeethNarendra Modi Governmentprime minister narendra modiघडलं-बिघडलंनरेंद्र मोदी सरकारपंतप्रधान नरेंद्र मोदीभाजपामुक्तपीठ
Previous Post

दिल्लीतील राजपथ आता कर्तव्यपथ! काँग्रेसचा विरोध, मिलिंद देवरांकडून कौतुक? चाललंय काय?

Next Post

भाजपा शिवसेना संपवू शकते? अमित शाहांच्या विधानाचा फायदा की फटका?

Next Post
भाजपा शिवसेना संपवू शकते?  अमित शाहांच्या विधानाचा फायदा की फटका?

भाजपा शिवसेना संपवू शकते? अमित शाहांच्या विधानाचा फायदा की फटका?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!