मुक्तपीठ टीम
मुंबई मनपा म्हणजे शिवसेनेसाठी सर्वात महत्वाचं बळ. शिवसेनेचं हेच बळ हिरावून घेण्याचा प्रयत्न भाजपा शिवसेनेसोबत सत्तेत असतानाही करत असे. आता तर थेट विरोधात असताना भाजपाने जोरदार तयारी चालवली आहे. मुंबई मनपाचं महायुद्ध जिंकण्यासाठी भाजपानं शिवसेनेविरोधात आक्रमक शैलीसाठी ओळखले जाणारे आमदार आशिष शेलारांना सेनापती बनवलं आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली २५ समित्यांची नेमणूक करण्यात आली आहे.
भाजपने मुंबई मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनपा निवडणूक समिती यादी जाहीर केली आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासोबत चर्चा करुन समित्या गठित करण्यात आल्या आहे. या निवडणुक संचालन समितीमध्ये खासदार गोपाळ शेट्टी, खासदार पूनम महाजन आणि मनोज कोटक आणि किरीट सोमय्या हे विशेष आमंत्रित असतील अशी माहिती भाजपाचे मुंबई अध्यक्ष मंगलप्रभात लोढा यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
भाजपाच्या संचालक समितीची यादी खालीलप्रमाणे:
निवडणूक संचालन समिती
- आशिष शेलार, अध्यक्ष
- राहुल नार्वेकर
- कालिदास कोळंबकर
- प्रकाश मेहता
- नितेश राणे
- पुनम महाजन
प्रशासन समन्वय समिती
- प्रविण दरेकर
प्रसार माध्यम आणि समाज माध्यम समिती
- अतुल भातखळकर, अध्यक्ष
- राम कदम
- अमरजीत मिश्रा
- विवेकानंद गुप्ता
जाहिरनामा समिती
- पुनम महाजन, अध्यक्ष
- योगेश सागर, सचिव
- सुनील राणे
- आर. यू. सिंह
- राजहंस सिंह
- प्रभाकर शिंदे
झोपडपट्टी संपर्क समिती
- गोपाळ शेट्टी
- आर. डी. यादव
- तृप्ती सावंत
संसाधन समिती
- मनोज कोटक
आरोपपत्र समिती
- अमित साटम, अध्यक्ष
- भालचंद्र शिरसाट
- विनोद मिश्रा
बाह्य प्रसिद्धी समिती
- पराग अळवणी
प्रसिद्धी सामुग्री व्यवस्थापन समिती
- मिहिर कोटेचा
- पराग शाह
बुथ संपर्क समिती
- संजय उपाध्याय
निवडणूक आयोग संपर्क समिती
- प्रकाश मेहता
- कृपाशंकर सिंह
ज्येष्ठ कार्यकर्ता संपर्क समिती
- भाई गिरकर
जाहीर सभा समिती
- प्रसाद लाड
वॉर रुम समिती
- प्रतिक क्रर्पे
ओबीसी संपर्क समिती
- मनिषा चौधरी
उत्तर भारतीय संपर्क समिती
- आर. यू. सिंह
- जयप्रकाश ठाकूर
- अमरजित सिंह
- जयप्रकाश सिंह
- ज्ञानमूर्ती शर्मा
व्यापारी आणि छोटे व्यावसायिक संपर्क समिती
- राज पुरोहित
दक्षिण भारतीयांसोबत संपर्क समिती
- कॅप्टन सेल्वन
असंघटीत श्रमिक घटक संपर्क समिती
- हाजी अराफत शेख
विशेष संपर्क प्रमुख
- आचार्य पवन त्रिपाठी
- आमदार विद्या ठाकूर
अनुसूचित जाती मोर्चाची जबाबदारी
- शरद कांबळे
नव मतदार संपर्क समिती
- तेजिंदर सिंग तिवाना
- पल्लवी सप्रे
- आरती पुगांवकर
महिला संपर्क समिती
- शलाका साळवी
- शितल गंभीर
प्रवासी कार्यकर्ता समिती
- संजय पांडे