Saturday, September 26, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

“आवाजी मतदानाने विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक घटनाबाह्य नाही!”: नाना पटोले

राज्यपालांच्याआडून विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपाकडून अडथळा

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
nana patole on voice vote election

मुक्तपीठ टीम

विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक आवाजी मतदान पद्धतीनेच होईल व उद्याच ही निवडणूक घेण्याचा सरकारचा मानस आहे. विधिमंडळाने अध्यक्षपदाची निवडणूक आवाजी मतदानाने घेण्याचा जो निर्णय घेतला आहे तो घटनाबाह्य नाही, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी स्पष्ट केले.

 

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आवाजी मतदानाने निवडणूक घेणे घटनाबाह्य असल्याचे पत्र राज्य सरकारला पाठवले असल्याच्या प्रसार माध्यमांच्या प्रश्नावर पटोले प्रतिक्रिया देत होते. पटोले पुढे म्हणाले की, नियम बदलण्याचे अधिकार विधिमंडळाला आहेत, त्यानुसार अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठीचे नियम बदल करण्यात आले आहेत. आवाजी मतदानाने अध्यक्षपदाची निवडणूक घेण्याची परंपरा लोकसभेतही आहे तीच प्रक्रिया महाराष्ट्राने स्विकारलेली आहे. इतर राज्यातही तीच परंपरा पाळली जाते. महाराष्ट्रातही विधान परिषद सभापतींची निवडणूक आवाजी पद्धतीनेच होते. त्यामुळे विधिमंडळाने घेतलेला निर्णय घटनाबाह्य नसून तसे पत्र राज्यपालांना पाठवले जाईल.

 

राज्यपालांच्या आडून भारतीय जनता पक्ष छुपा अजेंडा राबवत असल्याचे उघड झाले आहे. विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. परंतु राज्यपालांच्या माध्यमातून भाजपा जाणीवपूर्वक यात अडथळा आणत आहे. भाजपा सरकारने लोकसभेत तीन वर्षात उपाध्यक्षपदाची निवडणुक घेतलेली नाही, त्यांचा खरा चेहरा जनतेला माहित आहे, असेही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.

 

महात्मा गांधींना शिवीगाळ करणाऱ्या कालिचरण बाबावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करा..

 राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करणाऱ्या कालिचरण नावाच्या बाबावर तात्काळ राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.

 

यासंदर्भात बोलताना नाना पटोले म्हणाले की, कालिचरण नावाचा एक बाबा जो अकोल्याचा रहिवाशी आहे, त्याने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबद्दल अत्यंत खालच्या पातळीवरची भाषा वापरत शिवीगाळ केली आहे तर दुसरीकडे गांधीजींचा मारेकरी नथुराम गोडसेचे गोडवे गायले आहेत. महात्मा गांधींना शिव्या घालण्याचे पाप त्या कालीचरण बाबाने केले आहे. या बाबावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करुन तात्काळ कडक करावी.

 

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे विचार जगभरातील अनेक देश आदर्श मानतात व त्यानुसार वाटचालही करतात परंतु आपल्याच देशातील काही लोक जाणीवपूर्णक त्यांच्याबद्दल अपप्रचार करतात, त्यांच्याबदद्ल अर्वाच्च भाषा वापरतात हे निंदनिय आहे.


Tags: Assembly speakerBhagatsingh koshyarinana patoleVoicevote electionनाना पटोलेराज्यपाल भगत सिंह कोश्यारीविधानसभा अध्यक्षपद निवडणूक
Previous Post

“अनुसूचित जातींच्या ‘समाजकल्याण’ची ही आहे विदारक कथा…”

Next Post

मुंबई : मास्क न घालणाऱ्या प्रवाशांविरोधात मध्य रेल्वेने मोहीम तीव्र केली

Next Post
central railway no mask compulsory campaign

मुंबई : मास्क न घालणाऱ्या प्रवाशांविरोधात मध्य रेल्वेने मोहीम तीव्र केली

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!