Sunday, March 8, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

भाजपावर टीका करण्यापेक्षा मराठा समाजाच्या भल्यासाठी काम करा!

भाजपा प्रदेश पॅनेलिस्ट किशोर शितोळे यांचा संभाजी ब्रिगेडला टोला

August 28, 2022
in घडलं-बिघडलं
0
Kishor Shitole

मुक्तपीठ टीम

भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष मा. चंद्रशेखर बावनकुळे व राज्याचे ग्रामविकासमंत्री मा. गिरीश महाजन यांच्यावर संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्याने केलेल्या टीकेचा भाजपा प्रदेश पॅनेलिस्ट किशोर शितोळे यांनी समाचार घेतला. भाजपा नेत्यांवर टीका करण्यापेक्षा मराठा समाजाच्या भल्यासाठी काम करा, असे प्रत्युत्तर त्यांनी दिले.

ते म्हणाले की, संभाजी ब्रिगेडची स्थापना मराठा समाजासाठी काम करण्यासाठी झाली. मराठा समाजाच्या विविध मागण्या ब्रिगेडने मांडल्या. पण अचानक आता ब्रिगेड मराठा समाजाचे नुकसान करणाऱ्यांसोबत जात आहे, हे आश्चर्यकारक आणि दुःखदायक आहे. मराठा समाजाचे नुकसान करणाऱ्यांना साथ देऊ नका. मराठा समाजाच्या विकासाचा मुद्दा सोडू नका.

त्यांनी सांगितले की, ज्या उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकारने मराठा समाजाचे अस्तित्वात असलेले आरक्षण घालविले, आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाची प्रगती थांबवली, सारथी संकटात ढकलून मराठा विद्यार्थ्यांचे नुकसान केले अशा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसोबत संभाजी ब्रिगेडने जाण्याचे आश्चर्य वाटत आहे. त्याच वेळी मराठा आरक्षण देणाऱ्या, सारथी संस्था स्थापन करणाऱ्या, आण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळाचे पुनरुज्जीवन करणाऱ्या आणि मराठा समाजातील विद्यार्थ्यांना वसतिगृह देणाऱ्या भाजपालाच पुन्हा नावे ठेवताय, हे धक्कादायक आहे. फडणवीस सरकारने ही कामे केली त्यावेळी आपण सर्व बैठकांना सोबत होतो, साक्षीदार होतो आणि आज हा असा संभाजी ब्रिगेडच्या भूमिकेत अचानक बदल कसा झाला, असा प्रश्न पडतो.


Tags: BJPBJP PannelistKishor Shitolesambhaji brigadeकिशोर शितोळेभाजपाभाजपा प्रदेश पॅनेलिस्टसंभाजी ब्रिगेड
Previous Post

भारतीय तटरक्षक दलात नाविक आणि यांत्रिक पदांवर ३०० जागांसाठी संधी

Next Post

मंत्री अब्दुल सत्तार व आमदार रमेश बोरनारे यांना शिंदे-फडणवीस आताही पाठीशी घालणार का? : नाना पटोले

Next Post
Nana Patole On Abdul Sattar

मंत्री अब्दुल सत्तार व आमदार रमेश बोरनारे यांना शिंदे-फडणवीस आताही पाठीशी घालणार का? : नाना पटोले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
featured

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
June 20, 2025
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

May 29, 2025
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!