मुक्तपीठ टीम
कोरोना संकटात परिस्थिती हाताळण्यात झालेल्या चुकांमुळे भाजपा सरकारावर देशभर टीका होत असते. त्यातही उत्तरप्रदेशात गंगा नदीत सापडलेल्या मृतदेहांमुळे भाजपाच्या प्रतिमेलाच धक्का बसला असून ती संकटात आल्याचे मानले जात आहे. त्यामुळे कोरोना काळातली उत्तर प्रदेशची राजकीय परिस्थिती लक्षात घेता भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची संयुक्त चिंतन बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदीही सहभागी झाले होते. बैठकीत कोरोना काळातल्या सरकार आणि पक्षाच्या प्रतिमेबाबत चर्चा झाली.
भाजपा-संघ संयुक्त चिंतन कशासाठी?
• उत्तर प्रदेशात २०२२मध्ये विधानसभा निवडणुका आहेत.
• कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत सरकारविरोधात नागरिकांच्या नाराजीचा सूर पाहता या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं.
• उत्तरप्रदेशातील विधानसभा निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी वर्षही उरलेलं नसताना स्थानिक निवडणुकांमध्ये भाजपाला फटका बसणे धोक्याचे मानले जात आहे.
• २०२१च्या विधानसभा निवडणुकीत देशातील सर्वात जास्त खासदार निवडून देणाऱ्या राज्यावर आपला पूर्वीसारख्याच बहुमतासह ताबा असणं भाजपासाठी आवश्यक आहे.
• २०२४च्या निवडणुका
• त्यापार्श्वभूमीवर भाजप आणि संघाची ही बैठक महत्वाची मानली जात आहे.
• या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा, संघाचे सरकार्यवाह दत्तात्रय होसबाले, उत्तर प्रदेशचे भाजपचे संगठन मंत्री सुनील बंसल उपस्थित होते.
• ऑक्सिजनची कमतरता, गंगेत सापडलेले मृतदेह, लसींचा तुटवडा यासारख्या महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली आहे.
• या बैठकीत महत्वपूर्ण निर्णय घेतले गेल्याची माहित मिळतेय.
कोरोना काळात उत्तरप्रदेशमुळे भाजापा-मोदींना लोकल टू ग्लोबल फटका
• भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी मध्यंतरी सर्व राज्यांमधील भाजपाच्या प्रदेश अध्यक्षांना पत्र लिहिले.
• त्या पत्रात त्यांनी जनतेच्या सेवेसाठी एकत्र येण्याचं आवाहन केलं आहे. कोरोना काळात उत्तरप्रदेशची परिस्थिती अत्यंत गंभीर आहे.
• गंगाकिनारी मृतदेह आढळल्यानंतर जनमानसात सरकारची प्रतिमा डागाळली आहे. शिवाय विरोधकांनी टिकेची झोड उठवली.
• त्याचा फायदा घेत विरोधकांनी समाजमाध्यमांवरही भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष्य केले.
• उत्तरप्रदेश हे निवडणुकीसाठीचे मोदींचे गृहराज्य असल्याने त्यांच्या प्रतिमेलाही धक्का बसल्याचे मानले जाते.
• त्यातच जागतिक माध्यमांनीही या मुद्द्यावर भाजपा आणि पंतप्रधानांवर थेट टीका सुरु केली आहे.
• त्यामुळेच उत्तरप्रदेशातील परिस्थितीला गंभारतेने घेत भाजपाने संघासोबत चिंतन बैठक केली आहे.